Health News कडा शहरात अल्प दरात सुविधा देणाऱ्या सदभावना सेवाभावी दवाखान्याचे आज होणार उद्घाटन
कडा (प्रतिनिधी ) -
कडा शहरातील मातोश्री हॉस्पिटल संचलित सदभावना सेवाभावी दवाखान्याचा आज दिनांक 7 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे .विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश धस हे उपस्थित राहणार आहेत . तसेच प्रमुख उद्घाटक म्हणून कॅन्सर तज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे तसेच प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज , हरिभक्त परायण बबन महाराज , आमदार बाळासाहेब आजबे काका ,माजी आमदार भीमराव धोंडे ,डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य ,डॉक्टर अशोक गांधी , डॉक्टर पंडितराव खिलारे , रमजान शेठ तांबोळी , सरपंच युवराज पाटील , उपसरपंच बाळासाहेब कर्डिले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत . या दवाखान्यात ज्येष्ठ नागरिक व महिला रुग्णांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतील तसेच कॅन्सर रुग्णांसाठी मोफत बाह्य रुग्ण तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
कडा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या भव्य सदभावना सेवाभावी दवाखान्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान डॉक्टर अनिल मुरडे , डॉक्टर माधवी मुरडे व मोहसीन पठाण यांनी केले आहे .
stay connected