कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मोफत भरणार: सभापती रमजान तांबोळी
आष्टी प्रतिनिधी / अनिल मोरे
आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा खरीप हंगामाचा पिक विमा कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मोफत भरणार असून यासाठी कडा व आष्टी येथे शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.
खरीप हंगाम पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र सरकारने यामध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना पुढच्या तीन वर्षासाठी राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना राज्य सरकार मार्फत एक रुपयांमध्ये पिक विमा साठी अर्ज करता येणार आहे.
आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा एक रुपया पिक विमा व कागदपत्रे अपलोड करून देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कडा येथील अतुल कर्डिले यांचे गुरुदत्त शेतकरी सुविधा केंद्र मार्केट यार्ड कडा तर आष्टी येथे आंबेडकर चौक बस स्थानकाजवळ गौतम धस यांचे दत्तकृपा झेरॉक्स यांच्याकडे ही मोफत विमा योजना भरण्याचे काम सुरू राहणार आहे तरीही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा भरून येण्याचे आवाहन रमजान तांबोळी यांनी केले आहे.



stay connected