आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी आयशा बेग यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

 आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी आयशा बेग यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

*******************************

Ashti Nagar panchayat


****************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी नगरपंचायत भाजपाचे आ. सुरेश धस यांच्या ताब्यात असून त्यांच्या आदेशाने आष्टीच्या नगराध्यक्षपदी जिया बेग यांच्या मातोश्री बेग आयशा इनायतुला यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आदित्य जीवणे हे होते.त्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात सर्व नगरसेवक यांच्या उपस्थित सरानुमाते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Jiya baig nagaradhyaksh


      आष्टी नगरपंचायतमध्ये आ.सुरेश धस यांचे वर्चस्व असून सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युल्याप्रमाणे सर्वांना संधी देत माजी नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार धस आता कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.परंतु अर्ज भरण्याच्या दि.१९ रोजीच अध्यक्षपदासाठी बेग यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदासाठी निवड निश्चित झाली.त्यानंतर मंगळवार दि.२५ रोजी विशेष बैठकीत पिठासन अधिकारी अदित्य जीवणे यांच्या उपस्थितीत बेग आयशा इनायतुल्ला यांची निवड करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी धोंडे,गटनेते किशोर झरेकर,रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे, नगरसेविका पंखाबाई रेडेकर,फतिमा शेख,सुरेखा वाल्हेकर,भारत मुरकूटे,सुरेश वारंगुळे,अक्षय धोंडे,नाजिम शेख,शेख शरीफ यांच्यासह मुख्याधिकारी बाळदत्त मोरे,प्रकाश हारकळ,अजिनाथ गिते यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

*******************************

आष्टी शहराच्या विकासासाठी कटीबध्द -जिया बेग

*******************************

आष्टी शहराचा कायापालट आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नाने झपाट्याने होत आहे.येणा-या काळातही आपण आमदार धस यांच्या मार्गदर्शनाखाली करून शहराच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगीतले.

tej varta






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.