शांतिनाथ देशमुख यांचा सेवापूर्ती सोहळा आष्टी येथे संपन्न

 शांतिनाथ देशमुख यांचा सेवापूर्ती सोहळा आष्टी येथे संपन्न            


                     

आष्टी प्रतिनिधी                                    

 मौजे वाहली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक शांतिनाथ बाबुराव देशमुख यांचा सेवापूर्ती सोहळा आष्टी येथे झाला थाटात संपन्न झाला.गोरोबा काका कुंभार बचत गट आणि आष्टी तालुका कुंभार संघ यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी भूषविले होते.तर नगर जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष विनायक राऊत,प्राचार्य डॉ.कुंभार,डॉ.गणेश पिसाळ, चंद्रभान देशमुख,ह.भ.प.डोरले महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,तसेच बचत गट,तालुका कुंभार संघ,आप्त,स्नेही,मित्र यांच्या वतीने पाहुण्यांच्या उपस्थितीत, शांतिनाथ देशमुख यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.विनायक राऊत यावेळी म्हणाले की,गेली तीस वर्षे यांनी केलेल्या सेवेचा गौरव तुम्हा आम्हांच्या साक्षीने होताना सत्कारमूर्ती पती-पत्नींना मनस्वी आनंद झाला असेल.प्राचार्य डॉ.कुंभार म्हणाले, सेवेत असताना आपण आपल्या कार्यात इतके कार्य मग्न असतो की,आपल्याला कुठल्याही नातेवाईक,मित्रपरिवार यांना हवा तेवढा वेळ देता येत नाही.यानंतर भावी आयुष्या आयुष्यात मिळणारा वेळ यांच्यासाठी मोलाचा ठरो.कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन म्हणाले,शांतिनाथ देशमुख हे मितभाषी आहेत.आपल्या कार्यात त्यांनी स्वतःचा एक नावलौकिक मिळवला.कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल तोडकर यांनी केले.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.