अंभोरा पोलिसांची साकत शिवारात कारवाई १ लाख २० हजाराची हातभट्टी व रसायन केले नष्ट



अंभोरा पोलिसांची साकत शिवारात कारवाई
१ लाख २० हजाराची हातभट्टी व रसायन केले नष्ट




आष्टी ता.२२ (प्रतिनिधी)- तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकत शिवारात शनिवारी (ता.२२) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंभोरा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत छापा टाकला असता तेथे १ हजार ८०० लिटर हातभट्टी आढळून आली असून सदर ठिकाणीच हातभट्टी, रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले. सदरील कारवाईमध्ये अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सदरील हातभट्टी कोण तयार करत होते याचा तपास अंभोरा पोलीस करत आहे. सदरील कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अंभोरा येथून सहायक पोलीस निरीक्षक रोहीत बेंबरे यांची बदली झाल्याने मागील काही दिवसांपासून अंभोरा हद्दीत अवैध धंदे पुन्हा सूरू झाले होते. परंतु आजच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना चाप बसला आहे. सदरील कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, पोलीस हेडकॉन्स्टेबल सत्यवान गर्जे, लुईस पवार, पोलीस शिपाई शिवदास केदार, चालक जगदाळे यांनी कारवाई केली.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.