राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य यात्रेला मोठा प्रतिसाद

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य यात्रेला मोठा प्रतिसाद

-----------------


 संदिप जाधव/आष्टी

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनस्वराज यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या यात्रेची सुरुवात २२ जूलै रोजी सकाळी श्रीगोंदा तालुक्यातील  संत शेख मोहम्मद बाबा यांच्या प्रारंगणातुन यात्रेला सुरुवात झाली आहे.

ही यात्रा श्रीगोंदा तालुका, पारनेर,नगर तालुका,नगर शहर व राहुरी मुक्कामी  जाहीर सभा होणार आहे.

त्यानंतर दि.२३ जूलै रोजी श्री क्षेत्र शिंगणापूर,शेवगांव मार्गे पाथर्डी ,धामणगांव,कडा, जामखेड,चौडी मार्गे कर्जतला जाऊन या यात्रेचा समारोप जाहीर सभेने होणार आहे.तरी कडा येथील संत महाराज मठ येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन  राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ शिवाजीराव शेंडगे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.