Ashti तालुक्यात एक रुपयात pik vima नावालाच Krushi mantri च्या जिल्ह्यातच होतेय शेतकऱ्यांची आर्थिक लुट

 Ashti तालुक्यात एक रुपयात pik vima नावालाच 
Krushi mantri च्या जिल्ह्यातच होतेय
शेतकऱ्यांची आर्थिक लुट



आष्टी प्रतिनिधी- कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करत असलेला शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून एकीकडे आत्महत्या करत असताना शासन सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु ज्या सीएससी केंद्रांतून शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज करायला सांगितले. परंतु काही केंद्रचालकच शेतकऱ्यांकडून पीक विम्याच्या नावाखाली अर्ज भरण्यासाठी १०० ते १५० रुपये घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचे विदारक चित्र कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दिसून येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या सी एस सी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


शेतकऱ्यांकडून पैसे घेऊ नये यासाठी प्रत्येक अर्जासाठी ४० रुपये शासनाकडून सी एस सी केंद्र चालकांना देण्यात येणार आहेत, परंतु असे असतानाही काही सी एस सी केंद्र चालकांकडून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लुट सुरू आहे.  राज्य सरकारने १ रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी २६ जून पासून सुरू आहे. विम्यासाठीचे अर्ज ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सीएससी च्या माध्यमातून भरले जात आहेत. राज्य सरकारने पीकविम्याचा अर्ज भरण्याचा खर्च म्हणून प्रत्येक अर्जापोटी ४० रुपये विमा कंपनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला देणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही काही केंद्रचालकांकडून मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पठाणी वसुली  केली जात असल्याचे चित्र आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात १०० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून अधिकचे पैसे घेणाऱ्या केंद्राची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

-------


शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी १ रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणालाही देऊ नये. जर कोणी पीक विमा भरण्यासाठी १ रूपया व्यतिरिक्त जादा रक्कमेची मागणी करत असेल तर अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या केंद्राची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालय आष्टी येथे करावी. जास्त रक्कम घेणाऱ्या केंद्रावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.


- गोरख तरटे - तालुका कृषी अधिकारी,आष्टी 

----------


शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यात काही सीएससी केंद्रावर अतिरिक्त शुल्क घेतले जात आहे. ही बाब गंभीर असतानाही याकडे तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या सी एस सी केंद्र चालकांवर कारवाई करावी.

- शेख अब्दुलगणी सामाजिक कार्यकर्ते,आष्टी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.