Varkati : भागीरथी राधाकिसन पन्हाळे यांचे हृदयविकाराने निधन.
करमाळा/प्रतिनिधी.
सध्या आषाढी वारी पंढरपुर यात्रा सुरु असुन सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने वारकरी जात असुन .
सर्व देवस्थानच्या पायी दिंडी सोहळा पंढरपुरकडे प्रस्थान करत आहे.
त्यातच त्र्यंबकेश्वर येथील निवृती महाराज यांची पायी दिंडी पंढरपुर कडे प्रास्थान होत आहे .
त्या पायी दिंडीमध्ये जवळका येथील महिला भागीरथी राधाकिसन पन्हाळे वय वर्षे 65 या दिंडीमध्ये सामील झाल्या होत्या .
आठ दिवस चालत चालत ही निवृती महाराज यांची दिंडी करमाळा येथे पोहचली व तेथे ती दिंडी मुक्कामी राहीली .
त्यानंतर ती दिंडी तेथुन पंढरपुरकडे निघाली असता म्हणजे24 जुन रोजी करमाळा ते जेऊर या दरम्यान भागीरथी राधाकिसन पन्हाळे 9वाजुन55 मिनिटांनी चक्कर आली व त्या जमीनीवर कोसळल्या व लगेच त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यु झाला काही वारकर्यानी 108 ॲम्बुलन्स ला फोन केला व काही वेळात ॲम्बुलन्स तेथे आली व भागीरथी राधाकिसन पन्हाळे यांना घेउन ग्रामीण रुग्णालय करमाळा येथे आणण्यात आले व सरकारी वैद्यकीय अधिकारी यांनी भागिरथी राधाकिसन पन्हाळे यांना मयत घोषीत केले व त्यांच्या नातेवाईकांना कळविले व नातेवाईक यांनी करमाळा ग्रामीण रुग्णालय गाठले वत्यानंतर बॉडीचा पंच नामा झाला श्वच्छिवेदन करून पोलीसांनी मृतदेह 4 वाजात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले .
त्यानंतर नातेवाईकानी मृतदेह त्यांच्या गावी जवळका येथे नेहण्यात आला व रात्री 10 वाजुन 30 मिनीटानी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले .
stay connected