Pik nuksan bharpai : पिंपळा सर्कल ला तलाठीच नाही शेतकर्यांनी नुकसान अनुदानासाठी जायचे कोणाकडे

 Pik nuksan bharpai : पिंपळा सर्कल ला तलाठीच नाही शेतकर्यांनी नुकसान अनुदानासाठी जायचे कोणाकडे



             गेल्या वर्षी झालेल्या सतत पावसाच्या नुकसानीचे सरसकट अनुदान प्रती हेक्टरी ८५०० जाहीर झालेले आहे.यासाठी महसूल विभागाने सातबारा ८ अ, आधार कार्ड व बँक पासबुक जमा करून तलाठी ऑफीसला जमा करा अशा सुचना दिलेल्या आहेत, परंतु पिंपळा सर्कल चे तलाठी ऑफीस कायम बंध असते व सध्यातर चार्ज कोणाकडे आहे हे पण शेतकऱ्यांना माहीत नाही  याचे कारण म्हणजे ज्यांच्या कडे चार्ज आहे असे पिंपळा सर्कल चे तलाठी गवळी साहेब हे ट्रेनिंग ला गेलेले आहेत यामुळे त्यांनी चार्ज कोणाकडे दिला आहे हे अद्याप कळालेले नाही त्यांना फोन करून विचारले असता त्यांनी तहसीलदार साहेबांना विचारा असे सांगितले तहसीलदार साहेबांना विचारले असता त्यांनी लोणी सर्कल चे तलाठी   बोरूडे साहेबांन कडे चार्ज आहे असे सांगितले,बोरूडे साहेबांचा फोन बंद असल्यामुळे सध्या चार्ज कोणाकडे आहे, तलाठी ऑफीस पण बंध आहे,शेतकर्यांचे धावपळ होत आहे बाकी सर्कलचे कागदपत्रे जमा झालेले आहे परंतु पिंपळा सर्कल चे अद्याप चार्ज कोणाकडे आहे हेच माहीत नाही, तरी तहसीलदार साहेबांनी यावर लक्ष घालून नेमका चार्ज कोणाकडे आहे हे शेतकर्यांना कळवावे अशी विनंती सुंबेवाडी चे  अमर वाळके यांनी केलेली आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.