Sant wamanbhau शेतकरी गटाला बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले.
-------------------
आष्टी/प्रतिनिधी
कृषी विभाग व आत्मा अंतर्गत संत वामनभाऊ शेतकरी गट शेकापूर यांना पिक प्रात्येक्षिक म्हणून बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २६ जून रोजी शेकापूर ता.आष्टी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमात पौष्टिक आहार दिन या विषयी शेतकरी वर्गास मार्गदर्शन करण्यात आले तसेच पौष्टिक आहार दिनी पौष्टिक तृण धान्य म्हणून आत्मा अंतर्गत संत वामनभाऊ शेतकरी गटास पिक प्रात्येक्षिक म्हणून बाजरी बियाणे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास श्री.वी.एम.पवार कृषी पर्वेक्षक,श्री.एन.सी.खरात कृषी सहाय्यक,आत्माचे राजेंद्र धोंडे,पोखराचे रोहित पारेकर गटाचे अध्यक्ष डॉ.संदीप आंधळे गटातील सदस्य व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected