आष्टी येथे Bakri eid ला कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागतार्ह निर्णय हिंदू बांधवांकडून स्वागत

 आष्टी येथे Bakri Eid ला कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागतार्ह निर्णय हिंदू बांधवांकडून स्वागत

*********************************



*********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी आले असून आषाढी एकादशीचे पावित्र्य रहावे यासाठी बकरी ईद असूनही कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला असून  मुस्लिम बांधवांनी अत्यंत समंजस्यपणाने आष्टीतील सामाजिक बंधुता जपत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हिंदू बांधवानी स्वागत करत मुस्लिम बांधवानी स्वागत केले आहे.

     आष्टी नगरपंचायत येथील प्रांगणामध्ये मुस्लिम समाजाचे असलेले सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदू धर्मीय बांधवांच्या भावना लक्षात घेऊन  दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करणार आहोत.आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे या ऐतिहासिक घटनेमुळे आष्टी शहरातील सामाजिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य अबाधित असल्याचे या दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

 हा निर्णय घोषित करताना नगरसेवक मिर्झा जिया बेग,नगरसेवक शरीफ शेख,नगरसेवक इर्शान खान,नगरसेवक शमशुद्दीन शेख, नगरसेवक नाझीम शेख,नगरसेवक असलम बेग उपस्थित होते तर नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे, नगरसेवक सुनील रेडेकर,अतुल मुळे,दिलीप ससाणे आदी उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.