शासन आपल्या दारी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
प्रतिनिधी : संजय पंडित
सर्वसामान्यजनता,शेतकरी,
महिला आणि विद्यार्थी यांना राज्य शासनाच्या विविध विभागाशी नेहमीच दैनंदिन संबंध येत असतो.या सर्व घटकांचे दैनंदिन प्रश्न तात्काळ मिळाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख,पारदर्शक,कार्यक्षम आणि अधिक गतिमान होण्यासाठी राज्य शासनाचा "शासन आपल्या दारी" हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमा अंतर्गत कोकण व इतर आर्थिक मागासवर्गीय महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.या योजनेचा फायदा घेऊन इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थिनी आपल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
म्हणूनच या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आजच आपला अर्ज करणे गरजेचे आहे.
या महत्वाकांक्षी योजनेचा उद्देश देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागास वर्गीय प्रवर्गातील सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींना ऊच्य शिक्षणाकरिता विविध बँकांमार्फत शैक्षणिक कर्ज रकमेच्या १२% च्या मर्यादित व्याजाचा परतावा करता येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्य शिक्षणासाठी प्रोत्साहित करून राज्य शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थिनीना उच्य शिक्षणासाठी बँकेकडून पुढील प्रमाणे कर्ज मर्यादित वितरित केलेल्या रकमेवर कमाल १२% व्याज द दरापर्यंत व्याज परतावा अदा करण्यात येईल.
राज्यांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज रू.१० लाख, व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.१० लाख करण्यात आली आहे.परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु २० लाख करण्यात आलेली आहे.
या योजनेत पुढील प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
अ)राज्यांतर्गत अभ्यासक्रम : केंद्रीय परिषद कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त ( नॅक मानांकन प्राप्त)शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उतिर्न झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
ब) देशांतर्गत अभ्यासक्रम : देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
क)परदेशी अभ्यासक्रमासाठी : दर(Quacquarelli Symonds) च्या रँकिंग/गुणवत्ता पात्रता परीक्षा जीआरई टोफेल उतीर्न झालेले विद्यार्थी.
पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढील प्रमाणे..
१)अभियांत्रिकी : बीई सर्व शाखा, बिटेक सर्व शाखा,बी आर्च व संबंधित विषयावरील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
२)व्यवसायिक व व्यवस्थापन : विधी पदवी, फॅशन टेक्नॉलॉजी,हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग पदवी,व्यवस्थापन पदवी(एमबीए),एमसीए व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
३)कृषी अन्नप्रक्रिया व पशूविज्ञान अभ्यासक्रम : अनीमल अँड फिशरी सायन्स, बि टेक,बिव्हीएससी,बीएसई (कृषी व दुग्ध विज्ञान) व संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यास उपरोक्त अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१) अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.
२) उत्पन्नाचा दाखला(उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत)
३) महाराष्ट्राचा रहिवासी दाखला.
४) अर्जदाराचे व अर्जदाराच्या पालकाचे आधार कार्ड.
५)ज्या अभ्यासक्रमा करीता शैक्षणिक कर्ज हवे आहे त्या अभ्यक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका(किमान गुण ६०% गुनासह उत्तीर्ण)
६) अर्जदार व अर्जदाराच्या पालकाचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
७) अर्जदाराचा जन्माचा/वयाचा दाखला(वय १७ ते ३० वर्ष)
८)शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र : शिष्यवृत्ती,शैक्षणिक शुल्कनमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.
९)मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.
१०)आधार सलग्न बँक खाते पुरावा आणि इतर संबंधित पुरावे.
अर्ज नोंदणीसाठी महामंडळाची अधिकृत वेबसाईट..
www.msobcfdc.org.
पत्ता : एमएमआरडीए बिल्डिंग ए १, रूम नं.७,सिध्दार्थ नगर,शिवसेना शाखेजवळ, कोपरी,ठाणे (पूर्व)४००६०३.
संपर्क क्रमांक : ९३२०२०२०३३,८८७९९४५०८०,८७६७८५८०४५


stay connected