रेणापूर घटनेतील पीडितांची भिम आर्मी ने घेतली भेट...! तपघाले कुंटूबाला 24 तास पोलीस संरक्षण द्या - भिम आर्मी
लक्ष्मण कांबळे / लातुर प्रतिनिधी -
लातूर - जिल्ह्यातील रेणापूर येथे अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी निंदनीय घटना घडली आहे. गिरीधर तपघाले या मातंग बांधवाने गावातील खाजगी सावकाराकडून तीन हजार रुपये 10 रुपये टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात पुतण्या लेकरांना काठीने मारहाण केली.
तपघाले पैसे घरी देण्यासाठी गेले असता जास्तीचे पैसे पाहिजेत म्हणून मारहाण केली रेणापूर पोलीस स्टेशनला गेले असता त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने न घेता संध्याकाळी त्यांच्याच पुतण्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो म्हणून त्याला मारहाण केली व पुतण्याकडूनच शपत्रत घेऊन आरोपीलाही सोडून दिले त्यामुळे आरोपीचे बळ वाढले व त्यांनी
पुन्हा 2 तारखेला गिरीधारी तपघाले याच्या घरी हल्ला चढवला. यात आरोपींनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात मातंग बांधव गंभीर जखमी होऊन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असता त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तेव्हाच तातडीने कारवाई केली असती तर मातंग बांधवाचा जीव गेला नसता.
या घटनेची माहिती मिळताच भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठावाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांनी रेणापूर येथील मातंग समाज बांधव मयत गिरधारी केशव तपघाले यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. व या दुःखद प्रसंगी भिम आर्मी भारत एकता मिशन पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले व विभागीय पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन पिडीत कुटूंबाना 24 तास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी भिम आर्मी चे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे जिल्हा संघटक बबलू गवळे जिल्हा सह संघटक बापू शेळके शहर अध्यक्ष संदीप कांबळे किरण साळवे - खरोळा अध्यक्ष धम्मपाल ढाले - खरोळा उपाध्यक्ष अमोल गायकवाड- खरोळा सचिव , ओमभाऊ फुलारी , विशाल जोगदंड , निखिल कांबळे , किशोर कसबे ,आदी उपस्थित होते...



stay connected