संघटना वाढली बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने आणि हे सगळे खोके घेऊन तिकडे गेले - चंद्रकांत खैरे

 CHH.SAMBHAJINAGAR | संघटना वाढली बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने आणि हे सगळे खोके घेऊन तिकडे गेले - चंद्रकांत खैरे




 - लोक म्हणतात मुंबईत पत्ते खेळतात तरी पण त्याच्यासाठी हातपाय जोडून लोकांकडून मतदान मिळवून घेतलं आणि निवडून आणलं हा राग आहे. मी माझ्या फोनवरून अडीच हजार फोन आदल्या दिवशी केले. आम्हाला राग येणार नाही का लोक काय काय म्हणले तरी आम्ही हात पाय जोडले आणि तो मिंधे गटात जाऊन मोठे मोठे खोके घेतले. सर्वात पहिला मी आणि आमचा अशोक बावस्कर आम्ही पहिले लॉकअप मध्ये गेलो. परंतु त्या वेळेस प्रत्यक्षात एक वेळेस गेलो एस पी वगैरे होते म्हणून मारामाऱ्या झाल्या नाही अनेक वेळा आंदोलने झाले. शेवटी दुःख होतं की संघटना वाढली बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने आणि हे सगळे खोके घेऊन तिकडे गेले, त्यांचे प्रकरण बाहेर काढणार. सर्वात पहिले भुमरे पहिले टार्गेट राहणार. दुसऱ्या टार्गेट अब्दुल सत्तार मग बाकी हे सगळे चिल्लर राहणार आहेत.


38 वर्षांमध्ये जो प्रचार केला तो खूप छान केला आणि ठिकाणी जाणाऱ्यांना आणि आजच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, स्तंभ मेळावा कार्यकर्त्यांचा असतो, ते पण व्यवस्थित झालं. सिडको मध्ये हाफ चड्डीवर काम केले म्हणून शिवसेना वाढली असे अनेक शिवसैनिक आहेत ज्यांनी शिवसेनेचे मुहूर्तमेढ संभाजीनगर शहरांमध्ये केली आणि आजची सभा खासदार राऊत आल्यामुळे खूप व्यवस्थित झाली. बंडखोर लोकांना साफ करणार कारण की मी त्यांना निवडून आणलं. असे खैरे म्हणाले .






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.