जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी मुंडे यांच्या हस्ते सुंबेवाडीत विहीर पुनर्भरण शुभारंभ

 जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी मुंडे यांच्या हस्ते सुंबेवाडीत विहीर पुनर्भरण शुभारंभ




             - आपल्याला मिळालेल्या पदाचा पूर्णपणे वापर जनहितासाठी शेतकर्यांसाठी करायचा असा दृढ निश्चय बीड च्य जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केलेला आहे.भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेऊन त्यांनी विहीर पुनर्भरण कामावर भर दिला आहे या कायासाठी त्या सरसावल्या आहेत शूक्रवारी आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी येथे त्यांच्या आदेशानुसार महत्त्वाकांक्षी विहीर पुनर्भरण योजनेचा शुभारंभ गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संपत कोळेकर साहेब, ईंजिनिअर अभिजीत दरेकर साहेब सुंबेवाडी गावचे युवा सरपंच योगेश शेळके, ग्रामरोजगार सेवक लहानू शेळके, सुंबेवाडी सोसायटी संचालक सुखदेव साबळे, ग्रा सदस्य सुभाष वाळके,योगेश नाना शेळके, संजय पवार,बाळासाहेब पवार,सुदाम पवार ,मल्हारी खांदवे,व गावातील शेतकरी उपस्थित होते.नैसर्गिक संकटा मुळे कोणता हंगाम कसा जाईल,आणि त्याचा परिणाम कशाप्रकारे होईल हे निश्चित सांगता येत नाही.वास्तविक पाहता येणार्या खरिप हंगामात पाऊसाचे प्रमाण घटणार आसा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यामुळेच बीड च्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या आपल्या जिल्ह्यची अत्यंत बारकाईने लक्ष घेत आहेत.भविष्यात पाण्याचे संकट भासू नये यासाठी त्यांनी विहीर पुनर्भरणावर अधिक भर दिला आहे.विहीरीची पाणी पातळी वाढवण्यासाठी पुनर्भरण आवश्यक आहे.त्यामुळेच त्यांनी महसुल,कृषी आणि झेडपी ची यंत्रणा कामाला लावली आहे.विशेष म्हणजे त्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः फिल्डवर उतरून पूनर्भरणाच्या कामाला काकड हिर्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.आष्टी तालुक्यातील सुंबेवाडीत विहीर पुनर्भरण कामाला शुभारंभ करण्यात आलेला आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे साहेब,सरपंच योगेश शेळके, सामाजिक कार्यकर्ते अमर वाळके यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.