BJP News:भाजपा सरकारचे विकासात्मक कार्य सर्वसामान्यापर्यत पोचवण्याचे सोशल मिडिया बूथप्रमुखांचे काम.आ.सुरेश धस

BJP News:भाजपा सरकारचे विकासात्मक कार्य सर्वसामान्यापर्यत पोचवण्याचे सोशल मिडिया बूथप्रमुखांचे काम.आ.सुरेश धस

***************************

आष्टी मतदारसंघातील भाजपा सोशल मिडिया बूथ प्रमुखांची बैठक संपन्न

***************************





आष्टी (प्रतिनिधी)

आता काळ बदलला आहे.पूर्वी पेक्षा आत्ता कोणत्याही घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तात्काळ मिळत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपा सरकारचे धोरणात्मक तसेच विकासात्मक कार्याची माहिती सोशल मिडियामार्फत तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम आष्टी, पाटोदा,शिरूर मतदारसंघातील ४४१ बूथ केंद्रावरील भारतीय जनता पार्टीच्या सोशल मिडिया बूथ प्रमुखाने करावे असे प्रतिपादन भाजपा आ.सुरेश धस यांनी केले आहे.

         ते आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तालुक्यातील भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया बूथ प्रमुखांची बैठकीत बोलत होते. या बैठकीला ५०० च्यावरती सोशल मिडिया बूथ प्रमुख,विस्तारक यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

       यावेळी व्यासपीठावर युवा नेते जयदत्त धस, सागर धस,जि.प.सदस्य माऊली जरांगे, भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष सुरेश उगलमूगले, पाटोदा तालुकाध्यक्ष भागवत येवले,गणेश शिंदे,डॉ.पांडुरंग चौधरी,अभिजित शेंडगे, ज्ञानदेव काशीद आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.धस म्हणाले, येणाऱ्या  निवडणूका ह्या डिजिटल पध्दतीचा अवलंब करून होणार आहेत त्यामुळे सोशल मिडिया हे प्रभावी साधन असून मोदी सरकारच्या कार्याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आता बूथ प्रमुखांनी सोशल मीडियाला गती देण्याचे काम करावे. हे सगळं तरूणाई च्या हातात आलेले आहे.देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून या निमित्ताने देशभरात मोदी@9 सेवा सुरक्षा आणि गरीब कल्याण महा-जनसंपर्क अभियान मोठ्या प्रमाणावर राबवितण्यात आले आहे.आम्ही देखील आष्टी, पाटोदा,शिरूर मतदारसंघात हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवीत असून पार्टीने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रम यशस्वी रित्या घेतले आहेत असेही शेवटी आ.धस बोलताना म्हणाले.सोशल मिडिया बूथप्रमुखासाठी प्रशिक्षण देखील आयोजित केले होते. बैठकीसाठी सोशल मीडिया प्रमुखांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी आष्टी,पाटोदा,शिरूर कासार मतदारसंघातील सोशल मिडिया बूथ प्रमुख,भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.