५१ मजुरांवरील गुन्हे परत घेण्यास ३५३ कलमामुळे अडथळा,
केलेल्या कामाचे पैसे व बेरोजगारी भत्ता मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करु - जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ- मुंढे
पाटोदा ( प्रतिनिधी ) उपविभागीय अधिकारी कार्यालय तालुका पाटोदा येथे १७ /०८/२०१५ रोजी दुष्काळात काम मागणीसाठी आलेल्या रोहयो मजुरांवरील दाखल झालेले फौजदारी गुन्हे वापस घेण्यास ३५३ कलमा मुळे अडथळा आहे तर तत्कालीन परिस्थितीत ज्या मजुरांनी रोहयोचे काम केले आहे. त्यांच्या कामाचे पैसे व ज्या कालावधीत मागणी करूनही काम मिळाले नाही त्या कालावधीतील बेरोजगार भत्ता मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू असे आश्वासन गुरुवार दि.१५/०६/२०२३ ला घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ –मुंडे यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले
भारतीय शेतकरी कामगार पक्षांने 12/6 2013 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना तालुका पाटोदा येथील कष्टकरी मजुरांवर दुष्काळामध्ये रोहयोचे काम मागण्यासाठी आलेल्या माजुरांवरील फौजदारी गुन्हे मागे घेण्याचे आणि इतर मागण्या संदर्भात तत्कालीन रोहयो उपजिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक 9/ 9 /2015 रोजी पाटोदा येथील तहसील कार्यालयात आंदोलन कर्त्या मजुरांना लेखी आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली होती. त्यासाठी गुरुवार दिनांक १५-०६- २०२३ रोजी दुपारी बारा तीस वाजता जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ - मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या बैठकीला पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे ,रोहयो उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील , पोलीस उपाधीक्षक आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप आष्टी विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष भाई शिवाजीराव सुरवसे शेतकरी कामगार पक्षाची बीड तालुका चिटणीस तथा प्रसिद्धी प्रमुख एडवोकेट भाई राजेंद्र नवले शेकापचे ज्येष्ठ नेते भाई अभी लोंढे आणि तेजवार्ताचे संपादक बबलू भाई या बैठकीस उपस्थित होते




stay connected