नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा... कडा शहराची नळ योजना फक्त नावालाच

 नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा...
कडा शहराची नळ योजना फक्त नावालाच



संदिप जाधव/आष्टी

कडा शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने महिला त्रस्त आहेत. ग्रामपंचायतल पाणी सोडवण्याची मागणी करुनही नळाला पाणी येत नसल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी प्रचंड असल्याने घरोघरी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गल्लीबोळात टँकर शिरण्यासही प्रचंड अडचणी होत आहे.


पंधरा दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते परंतु ते या पाण्याला कमी प्रेशरमुळे पाणी पोहोचत नाही!

कडा परिसरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा येथील पाण्याच्या टाकीवरून होतो. 

परंतु नळाला पाणी सोडण्यात येत नाही.

कडा शहराची ग्रामपंचायत ही सहा प्रभाग असणारी ग्रामपंचायत आहे.

प्रत्येक वार्डात दर आठ दिवसाला पाणी सोडण्याची पद्धत आहे.परंतु आठ दिवस बाजूला राहीले.आज पंधरा दिवस झालेत तरीही नळाला पाण्याचा एक थेंबही नसल्याने महिला हैराण झाल्या आहेत.

पाणी सोडणाऱ्याशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

नळाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कडा ग्रामपंचायतने ठोस भूमीका घेऊन पाण्याची समस्या सोडवली पाहिजे अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.