शहरांना नुसती महापुरुषांची नावं देऊन उपयोग नाही त्यांचं पावित्र्य राखून विकासही करा - डॉ जितीन वंजारे

 शहरांना नुसती महापुरुषांची नावं देऊन उपयोग नाही त्यांचं पावित्र्य राखून विकासही करा - डॉ जितीन वंजारे




 आजकाल राजकारणामध्ये मत मिळवण्यासाठी वेगवेगळया क्लृप्त्या वापरल्या जातात,कोणी धर्माच्या नावाने, कोणी मंदिराच्या नावाने, कोणी पंथाच्या नावाने, कोणी शहराच्या नावाने,कोणी महापुरुषाच्या नावाने तर कोणी देवाच्या नावाने राजकारण करून आपोआपली सत्तेची पोळी भाजून घेत आहे परंतु समस्त मानव जातीसाठी, या भारत मातेसाठी, या भारत मातेच्या एकसंधतेसाठी, एकसमानतेसाठी स्त्री पुरुष, जातीपाती, भेदाभेद हे सगळे अमंगळ टाळून सार्वभौम राष्ट्रासाठी कोणी काम करताना दिसत नाही. ज्याप्रमाणे आहे माझा धर्म या नावाने अभिमान वाटतो त्याचप्रमाणे माझा देश असा सुर निघाला पाहिजे तसेच  ज्याप्रमाणे शहराची नावे बदलून महापुरुषाचे नाव ठेवले जातात ही गोष्ट अभिमानास्पद जरी असली तरीही त्या शहरांमध्ये गेल्यानंतर महापुरुषांच्या नावाला साजेस अशा पद्धतीचे विकासही होणं गरजेचं आहे नसता महापुरुषांची नावे शहराला द्यायची आणि शहरांमधील खराब रस्ते,शहरांमधील घाण,शहरांमधील नालेसफाई,तेथील शिक्षण व्यवस्था, तेथील सामाजिक स्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार करून विकासात्मक दृष्टिकोनातून राजकारण्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली पाहिजे नसता मत मिळवण्याच्या जटील प्रक्रियेमध्ये धर्मवाद, प्रांतवाद,जातीयवाद, महापुरुषांची नावे शहरांची नावे नुसतं बदलून चालणार नाही. शहरांमध्ये मानव जातीला या धरणी मातेला,या निसर्गाला उपयुक्त अशा पद्धतीची प्रकल्प राबवले गेले पाहिजेत उपयुक्त हिरवळ,स्वच्छ गार्डन,साफ सुथरी नदी,खेळण्यासाठी ग्राउंड,स्वच्छ मार्केट,स्वच्छतागृह,प्रदूषण विरहित शहर,चांगले पक्के रस्ते,नियंत्रित वाहतूक,उद्योग,रोजगार निर्मिती करणारे कारखाने, प्रोसेसिंग युनिट,लघुउद्योग,मोठे उद्योग, अभयारण्य, गायराणे, सुसज्य एमआयडीसी,पाणवठे,स्मशानभूमी,योग्य शिक्षण,सुधारित दळणवळण,सुप्रशासन आणि योग्य शासन या गोष्टी असणं गरजेचे आहे.असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

                   फक्त देश हिंदुत्ववादी करायचा देशातील नागरिक एकमेकांच्या जाती-धर्माच्या पंतांच्या विरोधात लढवून फाळणीयुक्त परिस्थिती निर्माण करायची आणि देशाच्या विकासाच्या नावाने झीरो हे उपयुक्त नाही .देशाचा अंतर्गत विकास होन अपेक्षित आहे . उपयुक्त रोजगार मिळणे गरजेचे आहे येथील बेरोजगारी नष्ट होणे गरजेचे आहे प्रत्येक हाताला काम मिळून उत्पन्नाचे स्रोत वाढवले गेले पाहिजे विकासाची गंगा खेडोपाडी पोहचली पाहिजे येथील लोकांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे ती शेती सुधारली गेली पाहिजे शेतीला पूरक गोष्टी मुबलक आणि अत्यल्प दरामध्ये  उपलब्ध झाल्या पाहिजेत शेतीला पाणी सिंचन तलाव याचं जाळ निर्माण झालं पाहिजे शेतीच्या मालाला हमीभाव आणि योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीची सुधारणा झाली पाहिजे.हे जर करणार असाल तर आणि तरच येथील सामान्य जनतेला दिलासा मिळेल नसता जनता कोमात आणि सरकार पैसे खाऊन जोमात ही परिस्थिती निर्माण होईल.

            या भारत भूमीवर आज पर्यंत अनेक लोकांचे आक्रमण झालेले आहे ही भारभूमी बुद्धाची भूमी आहे येथे चक्रवर्ती सम्राट अशोकाच अगदी सूराज्य तो भारताचा सर्वात तेजस्वी आणि प्रजेच्या हितासाठी काम करणारा राजा होता म्हणून तो सम्राट नावाने ओळखला जातो त्याने 'युद्ध नको या जगाला  बुद्ध हवा '  असा मोलाचा संदेश दिला,येथेच राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज,राजा महाराणा प्रताप,राजा टिपू सुलतान इत्यादी महान राजे याच भूमीत जन्मले वाढले लढले हीच भूमी आहे जिच्यावर  सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले.येथील सत्ता हातामध्ये घेतली भारतभूमीवर बाजारपेठासाठी, व्यापारासाठी बाहेरून आलेले लोक येथे स्थायिक झाली त्यांचा विशिष्ट गट निर्माण होऊन तेच या देशाचे सत्ताधारी लोक बनले आणि त्या पार्श्वभूमीवर या भूमीमध्ये त्यांची अनेक स्मारके,वस्तुसंग्रहालय, पुरातन वस्तू, स्मशानभूमी, उद्याने त्यांच्या राहण्यासाठी केलेली राजमहल,राजवाडे,किल्ले, गड हे सगळं या ठिकाणी सोडून त्यांना जावं लागलं त्यामुळे ही भारतभूमी या सगळ्यांची विरासत जपणारी भूमी आहे म्हणून तर भारत भूमीला " विविधतेने नटलेल्या परंपरांचा देश मानला जातो " याच भारत भूमीवर तीन शाह्या होऊन गेल्या मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाही त्यांनीही आपापल्या कार्यकाळामध्ये स्वतःच्या नावाच्या, स्वतःच्या महलाच्या,घरांच्या  विरासती या देशांमध्ये सोडलेल्या आहेत त्या विरासती जरी बऱ्या-वाईट असल्या तरी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो येथील सत्तांतराचा भागच आहे त्यामुळे कालबाह्य झालेल्या काही घटनांचा पुनरुत्थान होऊन नवीन नावे देणे हे उपयुक्त ठरेल आणि त्यातून नव्या पिढीला चांगला संदेश जाईल याच मताचा मी आहे परंतु त्याचबरोबर आपण येथील जनसामान्यांच्या विकासात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. येथील लोकांचे हित कशात आहे ते हितावह काम  आपल्या सरकारने केले पाहिजे.त्यामुळे नुसती महापुरुषांची नावं देऊन उपयोग नाही तर त्यांची नीतिमूल्ये त्यांचे विचार जपले गेले पाहिजेत.त्यांना मानवंदना किंवा मानसन्मान हा विकासात्मक काम करून देऊ असा संकल्प येथील राजकारणी आणि  सत्ताधारी यांनी केला पाहिजे असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले........

लेखन डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर-९९२२५४१०३०





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.