कडा ग्रामपंचायतचा अजब कारभार...! काही ठिकाणी रस्ते तर काही ठिकानी रस्तेच नाही.

 कडा ग्रामपंचायतचा अजब कारभार...!
काही ठिकाणी रस्ते तर काही ठिकानी रस्तेच नाही.






कडा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कडा शहरामध्ये काही ठिकाणी रस्ते बनवले, नाल्या बनवल्या परंतु नाल्या तुंबल्या असल्याने नालीचे पाणी रस्त्यावर साचत  आहे. त्या नालीच्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटत आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

पत्रकार चंद्रकांत महादेव मोरे यांनी 15 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत,तरी पण अद्याप अर्जाची कसल्याही प्रकारे दखल घेत नाही. 

ग्रामपंचायत निवडणूक आली की उमेदवार मतदान मागण्यासाठी प्रत्येकांच्या दारोदारी जातात उमेदवार हे फक्त पोकळ आश्वासने देतात आम्ही आपल्या दारात रस्ते बनवु नाली बनवु असे पोकळ आश्वासने देतात परंतु निवडणुक संपली की ते सर्व विसरुन जातात दिलेला शब्द पाळला जात नाही.

मी पत्रकार चंद्रकांत महादेव मोरे माझ्या घराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही नाली नाही   मी अनेक वेळा प्रत्येक महिन्याच्या मिंटीगमध्ये अर्ज दिले परंतु त्या अर्जाला शेवटी केराची टोपली दाखवण्यात आली.

तसेच 31मे रोजी कडा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी ठराव घेऊन  रस्त्याच्या कडेला असलेले लिबाचे झाड काढून आपल्याकडे जाणारा रस्ता व नाली करुन देऊ असे आश्वासन दिले होते परंतु 15दिवस उलटुन सुध्दा अद्याप कसलीही हालचाल दिसत नाही.

रस्ता हा पुर्णपणे 15फुटाचा आहे  सध्या हा रस्ता 10फुटाचा सुध्दा राहिला नाही .नाली सुध्दा ओपन असल्यामुळे  वराह त्यामध्ये  बसतात व घाण दुर्गंधी येते त्यामध्ये स्वच्छलयाचे पाणी सोडले जाते त्यामुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होण्याचे दृश्य आहेत.

पत्रकार चंद्रकांत महादेव मोरे यांनी दिलेल्या अर्जाची दखल ग्रामविकास अधिकारी घेणार की नाही का ग्रामविकास अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत का अशी माहिती पत्रकार चंद्रकांत महादेव मोरे यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितले.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.