एस.एस.चायनीज सेंटरचे उद्घाटन कडा येथे संपन्न..!

 एस.एस.चायनीज सेंटरचे उद्घाटन कडा येथे संपन्न..!

--------------------


आष्टी/प्रतिनिधी

तालुक्यातील कडा शहर ही मुख्य बाजारपेठ असणारे शहर आहे.यामध्ये तालुक्यातील अनेक छोटे मोठे खेडेगाव तसेच वाड्या वस्त्या एकत्र मिळून कडा शहराकडे वळले जात आहेत.

त्यामुळे कड्याला जनतेची आवक जावक असल्याने छोटे मोठे उद्योग जोरात चालत आहेत.त्याच अनुषंगाने कडा शहरातील नवयुवक मनोज जाधव व त्याचा छोटा बंधु सुमेध जाधव या दोघां भावांनी विचारविनिमय करून एस एस चायनीज सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला व आज दिनांक १६ जून रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

सध्या नवयुवक व्यसनाधीन झाला आहे.व्यसनाच्या आहारी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे.

परंतु या दोन बंधुनी व्यसनाधीन न होता आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे झाला पाहिजे यासाठी हे घेतलेले पाऊल भविष्यात सफल झाल्याशिवाय राहणार नाही.

आलेल्या सर्व मान्यवरांनी या दोघां भावांना नविन व्यसायाच्या शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेशशेट भंडारी, माजी उपसरपंच संभादादा कर्डीले,रासपचे जिल्हाध्यक्ष डॉ शिवाजीराव शेंडगे, राष्ट्रवादीचे सुनिल नाथ,ठकाराम दुधावडे,संपत सांगळे,नाना नलावडे,बबलू पानसरे,सुनिल जाधव,सावता ससाणे,मारुती कर्डीले,जयंत खंदारे,सोनू जाधव,नाना जाधव,संभाजी घाटविसावे,अदित्य गरूड पत्रकार संदिप जाधव सह आदी मान्यवर उपस्थित होते.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.