प्रलंबित फेरफार आणि शेतकऱ्यांचे बांध रस्ते या प्रकरणांचे तात्काळ निकाल लावावेत
***********************************
आ. सुरेश धस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
***********************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर फेरफार प्रकरणे प्रलंबित होते अंदाजे ७००० प्रकरणांमध्ये फेरफार अदालतीमध्ये ३००० प्रकरणे निकाली निघाली आहेत परंतु ४००० प्रकरणेही किरकोळ कारणावरून जुजबी तर काही ठिकाणी खोडसाळपणे तक्रारी केल्यामुळे प्रलंबित आहेत या तक्रारींची तात्काळ शहानिशा करून सर्व फेरफार प्रकरणे निकाली काढावीत तसेच तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बांध रस्ते न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत या बांध रस्त्यांसाठी तहसीलदार तारखा जवळच्या देत नाहीत तसेच शेतकऱ्यांना हेतू त्रास देत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत तहसीलदार संवेदनशील असल्याचे दिसून आल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित शेतीमाल घराकडे नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गत्रस्त आहे त्यामुळे बांध रस्त्यांचा प्रश्न न्याय निर्णय देऊन शेतकऱ्यांना बांध रस्ते उपलब्ध व्हावेत अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळकर यांनी देखील सकारात्मकता दाखवत याप्रकरणी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.


stay connected