दहावीच्या परीक्षेमध्ये मराठवाडा विभागात मुलींनी मारली बाजी, 93.23% मराठवाड्याचा निकाल

दहावीच्या परीक्षेमध्ये मराठवाडा विभागात मुलींनी मारली बाजी, 93.23% मराठवाड्याचा निकाल



- दोन मार्च ते पंचवीस मार्च कालावधीमध्ये येथे दहावीची परीक्षा या विभागांमध्ये 629 केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. औरंगाबाद विभागांमध्ये एक लाख 846 एकूण विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्यापैकी एक लाख 64 हजार 885 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.23 इतकी आहे जिल्हानिहाय विचार केला तर बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. औरंगाबादचा द्वितीय औरंगाबाद जालना तृतीय, परभणी चौथा आणि हिंगोली पाचव्या क्रमांकावर आहे. मुलामुलींच्या उत्तीर्ण टक्केवारीचा विचार केला तर 91.25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे आणि मुलींची टक्केवारी 95.66 इतकी आहे यामध्ये परीक्षा काळामध्ये 104 गैर प्रकार नोंद करण्यात आले 89 विद्यार्थ्यांची संपादन रद्द करण्यात आलेली आहे. 15 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. एकूण परीक्षा काळात गैरप्रकारची चौकशी पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक पडताळणीसाठी अर्ज करायचे आहे. त्यांनी तीन जून ते 12 जून पर्यंत विषय पन्नास रुपये याप्रमाणे आवेदन पत्र दाखल करायचे आहे. ज्यांना उत्तर पत्रिकेसाठी अर्ज दाखल करायचे आहे त्यांनी तीन जून ते 22 जून पर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रति विषय चारशे रुपये प्रमाणे आवेदन पत्र दाखल करायचे आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका 14 जून रोजी जिल्हा न्याय संकलन केंद्रावर मिळणार आहे. विशेष प्राविण्य उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 75 टक्के ते 90 टक्के पर्यंत टक्केवारी 39 पॉईंट इतकी आहे. विभागातील 644 शाळांचा निकाल शंभर टक्के लागले असून नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळाने दिली आहे.



 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव विजय जोशी






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.