दहावीच्या परिक्षेत जनता विद्यालयाचा निकाल 93.10 टक्के

दहावीच्या परिक्षेत जनता विद्यालयाचा निकाल 93.10 टक्के



धानोरा (प्रतिनिधी ) - एसएससी परीक्षा मार्च 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत जनता विद्यालय धानोरा मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ! नुकत्याच लागलेल्या एसएससी परीक्षा मार्च 2023 मधील जनता विद्यालयात चा शेकडा निकाल 93.10 लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी खान इस्रा कादर ९६.४० तसेच द्वितीय क्रमांक शेलार सोनम अजिनाथ ९५.६० तृतीय क्रमांक काळे आदित्य अशोक आणि सय्यद आर्शिया असलम 95 45 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत त्याचप्रमाणे गणित विषयात दोन विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे संस्थेचे सचिव श्री विजयकुमार बांदल अण्णा संस्थेचे अध्यक्ष श्री सय्यद अब्दुल भाई तसेच व्यवस्थापक विशाल भैया बांदल आणि मुख्याध्यापक गव्हाणे यु आर सर उपमुख्याध्यापक श्री ढोबळे एस एम पर्यवेक्षक श्री सय्यद एडी सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.