हंबर्डे महाविद्यालयाचे देविदास गांधले 30 जूनला सेवानिवृत्त
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री.देवीदास गांधले,आपल्या 32 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचे बी.ए.पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच झाले आहे.त्यांनी निष्ठेने 32 वर्षाची सेवा केली.त्यांचा सेवापुर्ती सोहळा 30 जून 2023 रोजी संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड,डॉ.गणेश पिसाळ,सर्व विद्यमान संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत.
stay connected