Vasantrao Naik : यांच्या जयंती निमीत्त दौलावडगाव येथे प्रगतशिल शेतकऱ्यांचा गौरव सोहळा
आष्टी ( प्रतिनिधी ) - हरितक्रांतीचे जनक माननीय मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त प्रगतशील व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे . दिनांक 1 जुलै 2023 रोजी सकाळी दहा वाजता सोनाई मंगल कार्यालय दौलावडगाव येथे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे . केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना व शेती विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय कृषी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी भूषण पुरस्कार विजेते बाबासाहेब पिसोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंती सोहळा संपन्न होणार आहे . याप्रसंगी कृषी आयुक्त सुनील चव्हाण ,कुलगुरू किसनराव लवांडे , भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब भोसले , जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर , के . डी . चौधरी , अनंत हंबर्डे सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी प्रयोग शिल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे . यामध्ये विजया गंगाधर घुले ,कैलास मारुती आंधळे ,विश्वंभर कुंडलिक जगताप ,दत्तात्रय भागुजी विधाते , हनुमंत लक्ष्मण गावडे ,अशोक दादासाहेब खेडकर ,जालिंदर उत्तम देवकर , संदीप रमेश गीते ,श्रीकांत अण्णासाहेब पवार ,महादेव बाबुराव भोसले ,सोनाली भागवत गर्जे ,श्रीराम बाबासाहेब सानप , संध्या विष्णू माळी ,प्रणव साईनाथ राऊत , मनोज शिवराम घुमरे ,दत्तात्रय लक्ष्मण ढेरे , तुकाराम नारायण ढवळे , सुभाष साहेबराव साबळे ,धनपाल भगवानराव गोंडे ,मुक्ताराम शिवाजी सोनवणे ,रामेश्वर अर्जुन बडगुजे ,सुदर्शन शिवाजी घोडके ,विश्वंभर भगवान घोडके ,अंबादास अभिमान डोईफोडे ,आनंद दत्तोपंत उबाळे ,शिवाजी पांडुरंग खोरदे ,आबासाहेब सिताराम राऊत , राजेंद्र निवृत्ती आतकरे ,जयंत सुखदेव शिनगारे ,कल्याण प्रभाकर कुलकर्णी , अतुल शाल्विंद सोळंके , राजाभाऊ गणपत नाईकनवरे , अण्णासाहेब भास्कर गायकवाड , अमोल रामा राऊत या प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात येणार आहे . तसेच फळपीक व सेंद्रिय भाजीपाला या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होईल . त्यानंतर सर्व उपस्थितां साठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे . या कार्यक्रमाचा लाभ आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी केले आहे .
stay connected