त्या QRT पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा - Akshay Dhavare
लातूर:-- लक्ष्मण कांबळे
QRT मधील पोलीस कर्मचारी मुस्लिम समाजा बद्दल वाइट कॉमेंट करून मुस्लिम समाजातील पोलीस कर्मचारी आणि मुस्लिम समाजाची भावना दु:खी करून लातूर जिल्ह्यातील शांतता भंग करनेस कारणीभूत आहे पोलीसांना जात धर्म नसतो "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत जेव्हा पोलीसच असे विचाराचे असतील तर हे सामान्य जनतेचे रक्षण कसे करणार ? लातूर (Q.R.T) मधील वैभव दापके पाटील यांच्या डोक्यात किती मुस्लिम द्वेष भरलेला आहे आपण कमेंट मध्ये पाहू शकता एका पोलीस कर्मचान्यांकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती यांच्या चुकीमुळे पोलीस प्रशासनावर चा विश्वास उडत आहे तरी महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि लातूर पोलिस अधीक्षक साहेबांनी याकडे लक्ष देऊन असल्या जातीवादी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून पोलिस दलातून बडतर्फ करावे अशी मागणी भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
stay connected