Save Electricity: घरगुती मिटर मिळत नसल्याने विद्युत वितरण कंपनी येथे आमरण उपोषण - Light Company
माजलगाव गढी रोड राष्ट्रीय महामार्ग क्र 222 वर मौजे ग्रामपंचायत श्रीगांरवाडी फाट्याजवळ सौ अनिता सदाशिव औसरमल या त्यांच्या कुटुंबासह पत्र्याच्या शेडमध्ये रहात आहेत परंतु रहात असलेल्या जागेमध्ये गेली दोन वर्षांपासून लाईट नाही वारंवार तालखेड येथील विज वितरण कार्यालयात संपर्क साधून विनंती अर्ज करुन नवीन मिटरची मागणी करुन देखील अद्याप पर्यंत अनिता औसरमल यांना मिटर मिळाले नाही तालखेड सबटेशनचे इंजिनिअर काळे साहेब यांनी या विषयात कसलीही मदत केलेली नाही लाईट मिटर साठी कोटेंशनचा भरणा करण्यास औसरमल तयार असताना देखील इंजिनिअर काळे यांनी औसरमल यांना सहकार्य केलेले नाही इंजिनिअर यांच्या हलगर्जी पणामुळे औसरमल कुटुंबीयांना आज पर्यंत लाईट मिळालेली नाही त्यामुळे त्या व त्यांचे कुटुंब अंधारात आहे लाईट नसल्याने मुलांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत संबंधित इंजिनिअरचे सातत्याने झालेले दूरलक्ष मुलांचे भविष्य अंधारात असल्या कारणाने या सर्व गोष्टींचा कंटाळून आज दिनांक 15/5/2023 सोमवारपासून सौ अनिता सदाशिव औसरमल त्यांची एक मुलगी तसेच एक मुलांसह उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या उपविभाग माजलगाव येथे आमरण उपोषणाला बसलेल्या असून जोपर्यंत लाईट मिटर मिळत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषणास बसलेल्या सौ अनिता सदाशिव औसरमल व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला असून कुटुंबाचे बरेवाईट झाल्यास संबंधित इंजिनिअर व उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या उपविभाग माजलगाव हे जबाबदार रहातील असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
stay connected