कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रमजानसेठ तांबोळी यांची निवड
आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार सुरेश यांचे कट्टर समर्थक रमजान सेठ तांबोळी तर उपसभापतीपदी नामदेव धोंडे यांची निवड करण्यात आली आहे .
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजली जाणारी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी १४ मे रोजी अविरोध झाली.
यावेळी सभापती,उपसभापती निवडी करण्यात आल्या. या बाजार समितीमध्ये आ. सरेश धस यांच्याकडे १२ संचालक,आ.बाळासाहेब आजबे तीन, माजी आ. भीमराव धोंडे तीन संचालक आहेत.
आजपर्यंत यांनी भूषवली सभापती पदे बाबासाहेब पाटील, बाबुराव फाळके, शिवाजी सुरवसे, विजयकुमार बांदल,बाबासाहेब आंधळे, लक्ष्मण नन्नवरे, संजय ढोबळे, अशोक ढवण, काकासाहेब थेटे, रमजान तांबोळी, शत्रुघ्न मरकड, दत्तात्रय जेवे हे बारा सभापती यांनी हे पद भूषविले आहे.
stay connected