हुतात्मा लालाजी वाघमारे यांची १०८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी
दि १९ धामणगाव(बार्शी) : हैदराबाद मुक्ती संग्रामातील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांची १०८ वी जयंती धामणगाव ( दु) येथे दि.१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने हुतात्मा लालाजी वाघमारे यांच्या जन्मगाव धामणगाव (दुमाला) तालुका बार्शी या ठिकाणी राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेचे व हुतात्मा स्तंभाचे पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगावचे सरपंच शिवाजी पाटील होते.
यावेळी लालासाहेब वाघमारे यांचा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पराक्रमी इतिहास ऊपस्थीतांनी आपल्या भाषणामध्ये सांगीतला.
या कार्यक्रमात स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी स्मारकाच्या सुशोभिकरणाबाबत धामणगाव ग्रामपंचायतीला निवेदन दिले.या निवेदनात स्मारकातील सुखसोयीबाबत,पुतळा निर्मीती बाबत,देखभालीबाबतच्या महत्वाच्या मुद्यांचा समावेश होता.
निवेदन स्वीकारल्यानंतर सरपंच शिवाजी पाटील यांनी निवेदनावर तत्काळ कारवाई करु असे अश्वासन ऊपस्थीतांना दिले.
या वेळी धामणगावातील ग्रामसेवक राहूल गरड,ऊपसरपंच नानासाहेब कदम,पोलीस पाटील गणेश मासाळ,सदस्य दत्ताञय ढेकणे,सदस्या रोहीणी ताटे,शाहीर भिमसेनआलाट,अशासेविका आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,आजी माजी स्वातंञ्यसैनिक तसेच धामणगाव नगरी आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय जिवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,जिल्हा संघटक गोवर्धन आलमले,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत लाडुळकर,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष गोवर्धन क्षीरसागर,धाराशिव- उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष मनोज लाडुळकर,कळंब तालुका संघटक किशोर पवार,विकास वाघमारे,अमोल सुरवसे,प्रशांत सुरवसे,बालाजी राऊत यांच्यासह नाभिक समाज बांधव देखील ऊपस्थीत होते.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांचे वंशज मा.दगडू शंकर वाघमारे तसेच हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे स्मारक समिती अध्यक्ष संतोष ताटे,सचिव सुनील वाघमारे,ऊत्सव समीती अध्यक्ष नवनाथ वाघमारे,कार्याध्यक्ष दिपक डिगे,ऊपाध्यक्ष रवी पप्पु इंगळे,शिवशंकर दिलीप वाघमारे,सचिव अंकुश पवार,खजिनदार अविनाश ताटे,पथ्वीराज वाघमारे,दिलीप वाघमारे,अनिल वाघमारे यांच्या सह अनेक समाजबांधवानी परिश्रम घेतले.
stay connected