सुषमाताई अंधारे कर्तत्वाने पुढे आलेले नेतृत्व.इतक्या सहजासहजी कोणीही झाकाळू शकत नाही- डॉ. जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नैतिकतेचा स्तर अतिशय रसातळाला गेलेला दिसत आहे. एकीकडे महिला सबलीकरण, स्री शक्ती,महिलांना 50 टक्के आरक्षण व महिला सशक्तीकरणाच्या नुसत्याच गप्पा मारल्या जातात, ज्या राजकारणाच्या जीवावर जनसामान्याच्या न्यायाची धुरा असते अशाच राजकारण्यांनी असभ्यतेचा वर्तन करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला शोभणार नाही. काल-परवा सुषमाताई अंधारे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळली ही खरी की खोटी हा विषय नसून राजकारण्यांमध्ये महिलांनी यायचं की नाही, महिलांना राजकारणामध्ये स्थान आहे की नाही, प्रत्येक पक्षांच्या श्रेष्ठींनी राजकारणातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे की नाही, एका सामान्य कुटुंबातून स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावर चळवळीमध्ये मोठी भूमिका पार पाडणाऱ्या आंबेडकरी विचाराच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. परंतु या घटनेनंतर प्रत्येक पक्ष व त्या पक्षातील महिला कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलेल की नाही आणि राजकीय सभ्यतेसाठी राजकीय नैतिक मूल्यासाठी तुम्ही आम्ही समाज, पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी म्हणून यावर कठोर भूमिका घेणार आहोत की नाही ? असा खणखणीत सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला. महिलांनी राजकारणात पुढे यावे, महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे, महिलांनी क्रीडा,संशोधन,शिक्षण,आरोग्य, सेवा,राजकारण,समाजकारण, इत्यादी क्षेत्रात पुढे आलं पाहिजे असं आपण म्हणतो पण त्यांच्या पुढे जान्यान आपल्यातला मग्रूर पुरुष जागा होऊन त्यांना मागे ओढण्याच पाप आपणच करत तर नाहीत ना? हा सवाल आता स्वतःला विचारण्याची गरज आहे .कारण राजकारणात महिलांवरील होणाऱ्या अत्याचार अन्यायाला आपणच जबाबदार आहोत,जास्तीत जास्त अन्याय अत्याचार राजकीय ,नोकरी किंवा क्रीडा इत्यादी क्षेत्रातील महिलांवर त्यांच्याच पुरुष सहकार्यांकडून होत आहेत हीच का आपली स्री पुरुष समानता?,हेच का आपलं स्री सबलीकरण?
क्रीडा क्षेत्रामध्ये होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून कुस्ती क्षेत्रातील महिला खेळाडू आपल्या न्याय हक्कासाठी व स्वतःवर झालेल्या अत्याचार अन्यायासाठी न्याय मागण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन करत आहेत परंतु स्त्रियांचा नुसता पुळका असणाऱ्याच सरकार त्याच्याकडे सर्रासपणे डोळेझाक करत आहे कारण अत्याचार करणारा गुंड हा सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता आहे हा राजकारणातील दुजाभाव लक्षात घेता स्री सबलीकरणाचे काम फक्त भाषणात बोलण्यासाठीच आहे की काय ? असा सवाल उत्पन्न होत आहे. मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बऱ्याच गोरगरीब महिलेवर अत्याचार अन्याय केलेल्या केसेस भारतामध्ये कमी नाहीत. परंतु त्यांच्यावर कसल्याच प्रकारे कार्यवाही होत नाही ही चिंताजनक बाब आहे.आज काल तर पक्षात फक्त गुंड दोन नंबर वाले मवाली पाळण्याच्या सर्धा लागल्या आहेत,उमेदवारी पण अश्याच लोकांना दिली जाते ,मोठमोठी पद देऊन यांची धंदे आरामात चालू ठेवली जातात आणि कार्यवाही फक्त विरोधकांनाच करायची आणि आपल्या खाली तसाच अंधार ठेवायचा अशा पद्धतीच्या कार्यवाया पोकळ असून राजकीय नैतिकतेला बाधा आणणाऱ्या आहेत. भारतातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे यावर माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याची गरज आहे कारण गुप्तचर संघटना ही सत्ताधाऱ्याच्या गुलाम झाल्याचे दिसत आहे.लोकांच्या न्याय पलिकेवरील विश्वास ढळता कामा नये. खेळाडू आपल्या न्याय हक्कासाठी महिना-महिना आंदोलन करत आहेत येथील ना गृहमंत्र्याला त्याची कीव येते, ना पंतप्रधानांना प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिलावर अन्याय अत्याचार होऊच नये अशा पद्धतीची यशस्वी कार्यप्रणाली राबवली गेली पाहिजे नसता पुरुषप्रधान देशांमध्ये अशाच पद्धतीचा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत राहील. महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील महिलांवरील घातलेल्या बंदी तोडून काढल्या, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे स्त्रियांवरील होणारे अत्याचार अन्याय याला वाचा फोडण्यासाठी हिंदू कोड बिलामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार, महिलांना सर्वच क्षेत्रात आरक्षण, महिलांना प्रसूतीची पगारी सुट्टी,महिलांना समसमान संधी, महिलांना वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत समान वाटा इत्यादी अधिकार दिले आणि स्त्री शक्ती व स्री सबलीकरणाचे महत्त्वाचे काम याच महामानवाने पहिल्यांदा केलं.ते पण तेंव्हाच्या मनुवादी व्यवस्थेत, पुरुष प्रधान व्यवस्थेत हे अमुलाग्र बदल घडवन इतकं सोप्पं नसतानाही हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे स्री शाशक्तिकरणासाठी आणि कामगारांसाठी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणारे महामानव म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय. आणि आज आपल्याच महिला सहकाऱ्यांवर बदनामी जनक,हानमार किंवा अत्याचार करणारे नेते आहेत लाज वाटते यांना नेते म्हणण्याची.पण आज स्वतःच्या कर्तुत्वावर,स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर, स्वतःच्या संघटन आणि भाषण शैलीवर अख्या महाराष्ट्राला पहाडी आवाजाने धडे देणाऱ्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांना त्यांच्याच पक्षातून हाणामारी झाल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असून या गोष्टीचा मी मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर जाहीर निषेध करून सर्वपक्षीय लोकांनी राजकीय नेत्यांनी स्री सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून समोर येऊन पुरुषप्रधान विक्रतिच्याच्या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे यासाठी सर्वांनी पुढे येण्याचं आव्हाहन करतो. आंबेडकरी विचाराचा वसा आणि वारसा घेऊन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये सरस कामगिरी करणाऱ्या सुषमाताई अंधारे ह्या बुद्धिवादी नेत्या असून त्यांची त्यांच्या पक्षात वाढती इमेज, महाराष्ट्र मध्ये वाढती लोकप्रियता व त्या समाजातील घडणार मोठे नेतृत्व की ज्या समाजाला आजपर्यंत कायम अंधारात ठेवलं अश्या व्यक्तीला एका मोठ्या पक्षाच मोठ पद भेटणं त्यांनी आदेश सोडण किंवा त्यांचं वाढत वजन हे काही तथाकथित नेत्यांना पचनी पडणार नसावं आणि म्हणूनच की काय सुषमा ताई अंधारे यांच्यावर असे भ्याड हल्ले होत आहेत.पण काहीही असो सुषमाताई तुमच्या पाठी समाज म्हणून चळवळीतील कार्यकर्ते म्हणून किंवा पाठीराखे भाऊ म्हणून हजारो लोक असतील आणि आहेतच त्यामुळे अश्या हल्ल्याना भीक न घालता नक्की जोमाने ताकतीने पुढे जाल अशी अपेक्षा करतो.शेंडे कापू वृत्तीतून अस वटवृक्ष जेंव्हा वर तोंड काढत मोठ होत त्यावेळी आम्हाला मनोमन आनंद होतो तुम्ही एकट्या नसून तमाम बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे घाबरु नका तुम्ही समाजाची प्रगती कराल अशी अपेक्षा ठेवून सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा झालेल्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो . ......
*लेखन-सामाजिक कार्यकर्ते-डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर*
stay connected