प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केला नेपाळ,चीन,बांगलादेशाचा प्रवास
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी नुकताच सात सवंगड्यासह,सहकुटुंब, दहा दिवसांचा पूर्वांचल,आसाम,मेघालय, सिक्कीम,दार्जिलिंग,मेघालय राजधानी शिलॉंगचा प्रवास केला.एकाच वेळी नेपाळ, चीन,बांगलादेश सीमा रेषेचे दर्शनही घेतले. नथुला बॉर्डर,बांगलादेशाची डावकी नदी, यात प्रत्यक्ष ढुंबण्याचा आनंदही घेतला.विलायची,दालचिनी यांची समृद्ध शेती प्रत्यक्ष पाहता आली.बर्फाच्छादित प्रदेशात याक या केसाळ प्राण्यांच्या सानिध्यात प्रत्यक्ष हिमवृष्टीचा आनंद घेता आला.गोहाटीला येऊन प्रसिद्ध देवीचे दर्शनही त्यांनी घेतले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केल्याने देशाटन या विचारांचा अंगीकार करून आजवर दक्षिण भारत,केरळ,कन्याकुमारी,बेंगलोर, उटी,मीनाक्षी मंदिर,बालाजी मंदिर,हैदराबाद, कर्नाटक,वाघा बॉर्डर,द्वारका,अमृतसर, हरिद्वार,डेहराडून,शिमला,कुल्लू मनाली, अमरनाथ वैष्णवी देवी,गुजरात,सोमनाथ आणि थायलंड,दुबई या दोन देशाला गवसणी घातली आहे.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या भारतभ्रमण,परदेश भ्रमण या अभियानाच्या यशाबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर, दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड, डॉ.गणेश पिसाळ,सर्व संचालक मंडळ,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


stay connected