शुरत्वाची व्याख्या समजून घेण्यासाठी छत्रपती शंभूराजांचा इतिहास वाचायला हवा... ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर.
आष्टी तालुक्यातील लोणी स. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत होते.
जिंकावा संसार// येणे नावे तरी शूर //
येरे का येती बापुडी //
किर अहंकाराची घोडी//
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या
या अभंगावर महाराजांनी कीर्तन सेवा केली.
आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीमध्ये महाराजांनी महिला व पुरुषांना खळखळून हसविले.
त्याचप्रमाणे समाज प्रबोधनावर विविध दाखले देत असताना समाजातील अनिष्ट गोष्टीवर ताशेरे ओढले. किर्तन सेवेमध्ये प्रबोधन करताना महाराज म्हणाले की आई वडील आणि नर् शरीर पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांचा इतिहास अमर राहील. छत्रपती शिवाजी राजांनी स्वाभिमान शिकवला तर संभाजी राजांनी शूरत्व शिकवले.
व्यसनांपासून दूर राहा, इंद्रियांचे गुलाम होऊ नका . आई वडील, संत आणि भगवंत यांच्याशिवाय जगामध्ये आपले कुणीच नाही... बाकी सर्व स्वार्थाचे जग आहे. पुढे बोलताना महाराज म्हणाले की पिकावरील वेगवेगळ्या रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे, प्रचंड प्रमाणामध्ये कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आहे. अटॅक हा आजार नसून ती एक मानसिक विकृती आहे. कुठल्याही ठिकाणी जी गोष्ट घडते ती त्याच जागेवर सोडून द्यायला शिकले पाहिजे वारंवार त्या गोष्टीचे टेन्शन घेतल्यामुळे अटॅकचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या दारू पिणाऱ्यांचे प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे असंख्य ठिकाणी सत्तर वर्षाच्या बापाला तीस वर्षाच्या मुलाला अग्नी डाव द्यायची वेळ उद्भवत आहे. समाजातील जवळपास 90 टक्के लोक दारूच्या आहारी गेलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराज आणि शिवरायांचे विचार शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक कुटुंबामध्ये समस्या निर्माण होत असल्याचं महाराजांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले. तरुण मुलींना उपदेश करताना महाराजांनी सांगितले की आपल्या आई-वडिलांच्या नावाला काळीमा लागेल अशा प्रकारचे कृत्य करू नये.
समाजामध्ये प्रचंड मोठी किंमत असणाऱ्या लोकांना मुलींच्या पळून जाण्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन रडत बसण्याची वेळ येत आहे.
त्यामुळे प्रत्येकाने बालवयापासूनच मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत.
आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यामुळे संभाजी राजांची जयंती करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे.
आज दिनांक 17 मे 2023 सकाळी 11 ते 1
या वेळेमध्ये हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये इंदुरीकर महाराजांची किर्तन सेवा झाली.
जवळपास 5000 लोक किर्तन सेवेसाठी उपस्थित होते. महीलांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात होती.
मागील जवळपास दहा वर्षांपासून लोणी येथे छत्रपती संभाजी राजे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शंभूराजांची जयंती साजरी केली जाते.
उन्हाचा प्रचंड उकाडा असल्यामुळे मोठमोठाले कुलर बसविण्यात आले होते. थंड पाण्याची सोय भाविकांना करण्यात आली होती.
पिंपळा, कोयाळ, मांडवा खुंटेफळ, वाटेफळ उक्कडगाव या परिसरातून
असंख्य नागरिक कीर्तनासाठी उपस्थित होते.
किर्तन सेवेसाठी ह भ प जंगले महाराज शास्त्री यांच्या आश्रमातील बाल वारकऱ्यांनी साथ संगत दिली. या कीर्तन सेवेसाठी वारकरी संप्रदायातील असंख्य महाराज मंडळी उपस्थित होते.
किर्तन संपल्यानंतर शिवरायांची आरती झाली.
सर्व भाविक व महाराजांचे आभार रामायणाचार्य ह भ प रामदास महाराज रक्ताटे यांनी मांनले.
stay connected