महाप्रबोधन यात्रेच्या सभेस बहुसंख्येने उपस्थित रहा. - बाप्पासाहेब घुगे
बीड ( तेजवार्ता ) :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हयाच्या शिवसेनेच्या जाहिर सभा होत आहेत. याच महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा हि दिनांक 20/05/2023 वार शनिवार या दिवशी सांयकाळी ठिक 5 वाजता माने कॉम्पलेक्स बीड येथे होत आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मा. बप्पासाहेब घुगे यांनी केले आहे. बीड जिल्हयामधील सर्व जाती धर्मातील तरुणांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सर्व जनतेला सभेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी शिवसेनेचे नेते मा.संजय राऊत साहेब व उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे ह्या उपस्थित राहून बीडकरांना प्रबोधन करणार आहे. बीडकरांना मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत.सुषमाताईचे आभ्यासपुर्ण भाषण ऐकण्यासाठी सर्वजाती धर्माच्या लोकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे जाहिर आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे यांनी केले आहे.
stay connected