कोठारी परिवाराने दिलेल्या भूमिदानामुळेच जामखेडला ग्रामीण आरोग्य प्रकल्प.
- डाॅ.रवी आरोळे
जामखेड , ता. १२ -
कोठारी परिवाराने दिलेल्या भूमिदानामुळेच आम्ही जामखेड येथे ग्रामीण आरोग्य प्रकल्प उभा करू शकलो असल्याची कृतज्ञता ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डाॅ. रवी आरोळे यांनी व्यक्त केली.
डाॅ. रवी आरोळे यांचा ५६ वा वाढदिवस कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला, यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, उद्योजक प्रवीण छाजेड , अमोल तातेड, धनंजय भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डाॅ. रवी म्हणाले, सण १९७० मध्ये जामखेड मध्ये आमचे वडील दिवंगत डाॅ. रजनीकांत आरोळे आणि आमच्या आई डॉ मेबल आरोळे हे आले. त्यावेळी बन्सीलाल कोठारी यांनी आम्हाला जामखेड बाजार तळामध्ये छोटे हॉस्पिटल चालु करण्यास सहकार्य केले. तेव्हा तीन कौलारूच्या खोल्यांमध्ये दवाखाना सुरू केला. यामध्ये गोरगरिबांचे आजारी पडलेल्या लोकांचे मोफत उपचार करू लागलो. यादरम्यान आम्हाला स्वातंत्र्यसैनिक दिवंगत बन्सीलाल कोठारी आणि चंदुलालजी कोठारी यांनी स्वतःच्या मालकीची रोडवरील ११ एकर जमीन मोफत देऊन मोठा दवाखाना उघडण्यास सहकार्य केले.त्यावेळी प्रतिकुल परिस्थितीत कोठारी परिवाराकडून मिळालेल्या मदतीमुळे आम्ही जामखेडला ग्रामीण आरोग्य प्रकल्प उभा करून, लोकांची सेवा करू शकलो.
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले, कोरोना काळामध्ये डाॅ. रवी आरोळे यांनी हजारो लोकांचे मोफत औषध उपचार करून, प्राण वाचवले. वडील दिवंगत डाॅ. रजनीकांत आरोळे आणि आई दिवंगत डाॅ.मेबल आरोळे यांचा समाजसेवेचा वारसा डाॅ.रवी आरोळे समर्थपणे सांभाळत आहेत.
यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी म्हणाले, १९७० साली जामखेडमध्ये एकही दवाखाना नव्हता. त्यावेळेस साध छोटस हाड जरी मोडलं, तरी नगरला जावं लागत होतं. परंतु डॉ. रजनीकांत आवळे आणि मेबल आरोळे आल्यापासून जामखेडच्या गोरगरिब रूग्णांच्या अडचणी दूर झाल्या. यावेळी अमोल तातेड यांचेही भाषण झाले.
जामखेड - ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डाॅ.रवी आरोळे यांचा सन्मान करताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, उद्योजक प्रवीण छाजेड , अमोल तातेड, धनंजय भोसले,
stay connected