National Award presented to Raja Mane - राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान

National Award presented to Raja Mane - राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान

National Award presented to Raja Mane - राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान

पुरस्कार स्वीकारताना राजा माने 

मुंबई,दि:- संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रदान करण्यात आला.

अफ्टरनून व्हॉइस माध्यम समुहाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून समुहाच्या प्रमुख डॉ.वैदेही मातन यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात.या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख,"वागळे की दुनिया फेम" अंजन श्रीवास्तव,लेखक ईकबाल दुर्राणी यांना जीवनगौरव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. "चला हवा येऊ द्या" निर्माता दिग्दर्शक डॉ.निलेश साबळे, पद्मश्री गुलाबो पसार, आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर गौरी, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील साक्षी जोशी, जितेंद्र जोशी, राजकारणातील खा.ईम्तियाज जलील,आ.भारती लव्हेकर यांना भरत दाभोळकर, डॉ.बात्रा,नादिरा बब्बर,अभिनेते प्रदीप वेलणकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.