Graware Colledge To Vanaj - आणि वनाज ते गरवारे कॉलेज अशी अनोखी ट्रीप
दिनांक १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांचे औचित्य साधून पुण्यातील आझाद रिक्षा चालक संघटना यांच्या माध्यमातून रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना महा मेट्रो - पुणे मेट्रो यांच्या सौजन्याने गरवारे कॉलेज ते वनाज आणि वनाज ते गरवारे कॉलेज अशी अनोखी ट्रीप घडवून आणली.*
या वेळी मधु तारा प्रमुख मा. श्री. नितीनजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रिक्षा चालक दिवसभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर प्रवाशांची सेवा करतात. अशा रिक्षा चालकांना स्वतः प्रवासी म्हणून आपल्या कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेता यावा म्हणून हा उपक्रम राबविल्याचे संघटनेचे प्रमुख मा. श्री. शफीकभाई पटेल यांनी सांगितले. या उपक्रमात शेकडो रिक्षा चालक तसेच पुणे शहर अध्यक्ष मधुकर यादव, उपाध्यक्ष अविनाश वाडेकर, गंगाप्रसाद यादव, राहुल व्यास, इम्तियाज मुजावर, दस्तगीर पिरजादे, सिमिनाज मुजावर, संजय पांगुळ, सदाशिव टाक रमेश साळवे तानाजी जागडे व इतर पदाधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी मेट्रोचे स्टेशन प्रमुख मा. श्री. मनोजजी डॅनीयल साहेब हे प्रमुख उपस्थिती म्हणून होते.या वेळी डॅनियल साहेब म्हणाले कि रिक्षाचालक आणि मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवाशांना दर्जेदार सेवा आपण देऊ शकतो. हैद्राबाद येथे सुद्धा त्यांच्या माध्यमातून हजारो रिक्षाचालक या सेवेत सहभागी झाले आहेत. तरी पुण्यातील जास्तीत रिक्षाचालकांनी मेट्रो सोबत जुळून व्यवसाय करावा.
या वेळी पुण्यातील सर्व रिक्षा संघटना यांना एकत्र करणारे मा. श्री. तुषार पवार यांनी ही रिक्षा चालकांनी एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवर्जून सांगितले.या वेळी मधु तारा फाउंडेशनच्या कार्यपद्धतीबाबतची माहिती शफीकभाई पटेल यांनी दिली. आपल्या भाषणात आरोग्य, दिव्यांग यांच्यावर मधु ताराचे महाराष्ट्रभर चालू असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना मधु तारा प्रमुख श्री नितीन शिंदे यांनी दिली.
stay connected