एस टी वाहक गणेश काळे यांचा प्रामाणिकपणा

 एस टी वाहक गणेश काळे यांचा प्रामाणिकपणा



प्रवाशी महिलेचे हरवलेले पैशाचे पाकिट धानोरा येथील रहिवाशी असलेले वाहक गणेश काळे यांनी प्रामाणिकपणे परत केले . सविस्तर वृत्त असे की दिनांक १/५/२०२३ रोजी आष्टी आगार बस क्रमांक एम एच २०/ एन ९२२३ मायंबा ते आष्टी कर्तव्य करत असताना सदरील महिला हिराबाई शेकडे या आपल्याला लहान मुलाला घेऊन कडा येथे हॉस्पिटलला जाण्यासाठी गाहुखेल या ठिकाणावरून बसल्या . गाडीत गर्दी असल्याकारणाने त्या पाठीमागे सीटवर बसल्या . गाडी कडा येथे आली असता मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी गडबडीने उतरल्या आणि त्यावेळी त्यांचे पाकीट गाडीमध्येच पडले . उतरल्यानंतर आपल्या मुलाला घेऊन बस स्थानकावर बसले मात्र पैसे हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले .  बॅग मध्ये कुठे ठेवलेले पैसे सापडत नव्हते . तोपर्यंत गाडी  निघून  गेली होती . वाहक गणेश काळे हे ड्युटी संपत आली होती म्हणून रोजच्या असणाऱ्या सवयीप्रमाणे त्यांनी गाडी चेक करण्यासाठी उठले असता त्यांच्या नजरेस ते पाकीट सापडले . त्याच वेळी काळे यांचे सहकारी संदीप खाकाळ यांनी त्यांना फोन करून विचारले असता गणेश काळे यांनी सांगितले की गाडी मध्ये त्यांना पाकीट सापडले आहे .सदरील रक्कम ही ६००० हजार होती .   ते पाकीट त्या महिलेला सुपूर्द केल्यानंतर तिला गहिवरून आले होते, गणेश काळे म्हणतात - मला हे पुण्य कर्म केलेल्या कर्तव्याचा सार्थ अभिमान वाटत आहे कारण छत्रपती शिवरायांची शिकवणच आहे गरिबांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही . गणेश काळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.