Bhimjayanti बंद पाडणाऱ्या चाकूरचे पी आय बालाजी मोहिते यांच्यावर तात्काळ कारवाई करा.. आंबेडकरी जनतेची मागणी

 

Bhimjayanti बंद पाडणाऱ्या चाकूरचे पी आय बालाजी मोहिते यांच्यावर तात्काळ कारवाई करा.. आंबेडकरी जनतेची मागणी




पदाचा गैरवापर करीत आंबेडकरी जनतेला बंदूकीचा धाक दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती बंद पाडणाऱ्या चाकूरचे पी आय बालाजी मोहिते यांच्यावर तात्काळ कारवाई करा.. आंबेडकरी जनतेची मागणी

अहमदपूर तालुक्यातील उमरगा कोर्ट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा परवाना असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनीच खोडा घातल्याने भिम प्रेमींमध्ये तिव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे .

सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील उमरगा कोर्ट या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत  चाकूर चे पी आय  बालाजी मोहिते यांनी आपल्या पी आय पदाचा गैरवापर करत आंबेडकरी जनतेला बंदुकीचा धाक दाखवून  मिरवणूक बंद पाडली त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक यांचेकडे  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

 लातूर जिल्ह्यातील पोलिसांचा करारनामा

पदाचा गैरवापर करीत आंबेडकरी जनतेला बंदूकीचा धाक दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती बंद पाडणाऱ्या चाकूरचे पी आय बालाजी मोहिते यांच्यावर तात्काळ कारवाई करा..



अहमदपूर;----


लातूर जिल्ह्यातील . अहमदपुर तालुक्यातील उमरगा कोर्ट  या गावी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त पोलीस ठाणे चाकूर यांचा परवाणा घेऊन जयंती करण्याचे ठरले होते. त्यानुसार दि. 25 एप्रिल 2023 रोजी सायं. 5 वा. सुमारास जयंतीस सुरुवात झाली मिरवणूक दरवर्षीच्या मार्गाने पाटील गल्ली सायं 7.30 वा आली असता श्री. मोहीते साहेबांनी मिरवणुकीतील स्पीकरचे तार तोडले व स्थानिक लोकांना सांगीतले की बंद करा. मिरवणुक आता पुढे जाणार नाही. म्हणून धमकी देण्यास सुरुवात केली. परंतु तेथील स्थानिक लोकांनी त्यांना विनंती करत सांगीतले की आम्ही दर वर्षी प्रमाणे परवाण्यानुसार मिरवणूक काढत आहोत. आणि वेळ पण भरपुर शिल्लक असताना सुध्दा आपण असे का करत आहात असे विचारले असता आम्हाला बंदुकीचा धाक दाखवू लागले व म्हणून लागले की पुढे आलात तर खल्लास होताल. तुमचा एक दिवस आहे. बाकी 364 दिवस माझे आहेत.  स्पीकर मालक आणी मिरवणुकीचा रथ ज्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा होती तो रथ त्यांनी स्मशानभूमी येथे नेऊन लावला त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाली आहे व त्यामुळे स्थानिक नागरीकांच्या मनाला ठेच पोहचली आहे पोलीस जनतेचे नौकर असतात . त्यांचं संरक्षण ही त्यांची जिम्मेदारी असते परंतू 

पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही.. असे आंबेडकरी जनतेने निवेदनात म्हटले आहे .

दर वर्षी सदर मिरवणुक ही फक्त दोन होमगार्ड व एक कॉन्स्टेबल यांच्या मदतीने होते परंतु यावर्षी तब्बल 37 पोलीस गावात हजर होते. म्हणजे हा कट आगोदरच रचला गेला होता... असाही आरोप भिम भक्तांनी केला आहे . तेजवार्ता प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे अहमदपूर लातुर






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.