धर्मनिरपेक्ष सहिष्णू अमर शहिद Tipu Sultan (रह.)
भाग -१
Tipu Sultan
टीपू सुलतान हा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. याचबरोबर तो पूर्वग्रह दोषापासून दूर आणि अत्यंत सहिष्णू वृत्तीचा होता. हि गोष्ट सर्व न्यायनिष्ठ इतिहासकारांनी मान्य केलेली आहे. पूर्वग्रह दोष बाळगणाऱ्या इतिहासकारांनी यावाबतची सुलतान टीपूची बदनामी करण्याचा खूप आटापिटा केलेला आहे. भारतातील हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडावी व आपली सत्ता कायम टिकवावी अशी इंग्रजांची कुटील नीती होती हि गोष्ट तर जगप्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या कणाकणात अमर शहिद टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णूतेचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. हल्ली तर प्रवास करणे इतके सोपे झाले आहे की ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे. तो प्रत्येक मनुष्य म्हैसुरात जाऊन टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे आपल्या डोळयांनी दर्शन घेऊ शकतो.
म्हैसूर राज्यात प्रवेश करताच सर्वप्रथम ज्या इमारती आपल्या अस्तित्वाची चोहिकडे ठळकपणे जाणीव करून देतात त्या म्हणजे हिंदूची प्राचीन मठ व मंदिरे या होत. यापैकी काही तर हजार वर्षांच्याही पूर्वी बांधलेली आहेत. टीपू सुलतान जर द्वेष बाळगणारा असता तर सदरहू मंदिरे नामशेष करणे त्याला सहज शक्य होते. परंतू याच्या अगदी उलट या मंदिरांना त्याने जहांगिऱ्या व इनाम दिलेले आहेत. यासंबंधीची शाही फर्माने व सनदा अद्यापही सदरहू मंदिरात उपलब्ध आहेत. सत्य शोधणाऱ्यांसाठी त्या लाभदायी ठरू शकतात.
श्रीरंगापट्टनम टीपू सुलतानाच्या राजधानीचे शहर पुष्कळांनी पाहिले असेलच. प्रतिवर्षी दूरदूरहून हजारोंच्या संख्येत लोक ते पाहण्यासाठी येतच असतात. श्रीरंगपट्टनम् रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताक्षणीच दोन भव्य मंदिरांवर पर्यटकांची दृष्टी खिळून राहते. या मंदिराच्या अगदी जवळच टीपू सुलतानचा राजमहल होता. त्यांच्या महालाच्या पाठीमागे अगदी लागून दुसरे एक भव्य मंदिर आहे. बंगलोरात देखील टीपूच्या महालाला लागून एक लहान मंदिर अद्यापही उभे आहे. तसेच म्हैसूर प्रदेशातील श्रीनगरी, वेल्लूर, नजनगड, अल्सुर, बंगलुर इ. ठिकाणी अशीच कित्येक शतकांपूर्वी बांधलेली मंदिरे अद्यापही डौलाने उभी आहेत. या मंदिरातही टीपूने 'वतने' व 'इनाम' दिलेले आहेत. या मंदिरातील स्वामी व आचारींबद्दल त्याच्या मनात नितांत आदर होता. याबाबत बोलके पुरावे व प्रमाण आजही म्हैसूर राज्यातील पुरातन विभागात सुरक्षित आहेत.
म्हैसुरच्या पुरातन विभागाचा अहवालाबाबत इ. स. १९१६ यात लिहिले आहे. श्रीनगरीच्या मठात नबाब हैदर अलीचे तीन पुत्र व टीपू सुलतानची तीस पत्रे व फर्मान मिळवली आहेत. सदरहून पत्र व फर्मा नात हिजरी सणाबरोबरच स्वतः सुलतानने निर्माण केलेला मौलदी सनदी लिहिलेला आहे. इतर पत्रांच्याविरूद्ध ज्यांच्यात सुलतानचे नाव प्रथम लिहिले जात असे सुलतान श्रीनगरी मठाच्या शंकाराचार्यांचे नाव व मायने प्रथम लिहिले आहेत. स्वतःच्या नावाबरोबर त्याने कोणताच किताब व मायना लिहिलेला नाही. या पत्रापैकी बहुतेक पत्र म्हैसूरच्या तिसऱ्या युद्धातील घटनांवर प्रखरपणे प्रकाश टाकतात. काही पत्रे श्रीनगरी मठातील शंकराचार्यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात लिहिलेली आहेत.
म्हैसूरच्या तिसऱ्या युद्धात इंग्रज निजाम व पेशवे तिन्हींनी टीपूवर हल्ला चढविला होता. पेशबाई सैन्य भाऊंच्या तैनातीत होते. सदरहून सैन्याने इतर सर्व प्रदेशात लूटमार आणि विनाश तर पसरविलाच परंतु श्रीनगरीसारखे स्थळही त्यांच्या हातून वाचू शकले नाही. शंकराचार्यानी टीपू सुलतानला लिहिले की, पेशबाई सैन्याने श्रीनगरातील मठ लुटून उध्वस्त केला आहे. शारदा देवतेची मुर्तीदेखील आपल्या जागेतून उखडून फेकून टाकली आहे. मठातील हत्ती व घोडे इत्यादी सर्व मराठी सैन्याने लुटून नेले आहे.
याचे उत्तर टीपू सुलतानने मोहरब्बानी ३० इ.स. १७९१ ला खालीलप्रमाणे दिले आहे. आमच्या मुलूखावर हल्ला चढवून जे आमच्या रयतेला छळीत आहेत. त्या शत्रूंना आम्ही शिक्षा करीत आहोत. आपण सार त्याग केलेले विभूती आहात म्हणून शत्रूंचा नाश व्हावा, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे आपले व मंदिरातील इतर ब्राह्मणांचे कर्तव्य आहे जेणेकरून देश सुरक्षित व रयत सुखी आणि आनंदित रहावी.
दुसऱ्या एका पत्रात स्वामीजींनी सुलतानला लिहिले होते की त्यांना अन्य एका ठिकाणी मुक्काम हलविणे भाग पडले आहे. तसेच पेशव्यांच्या सैन्यांनी मंदिरात शिरून ब्राह्मणांना ठार व जखमी केले आहे. शिवाय मंदिरातील सर्व मालमत्ता लूटून नेली आहे. म्हणूनच सरकारच्या मदतीशिवाय शारदादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणे शक्य नाही. यांच्या उत्तरात सुलतानने लिहिले. पवित्र स्थळांचे अनादर करतानादेखील जे लोक नाहीत. या कलियुगात त्यांना क्वचितच आपल्या कडू फळे मिळतील. लोक वाईट कृत्ये हसत हसत करतात. परंतू त्यांची कडू फळे रडत रडत चाखतील. शंकराचार्यांशी द्रोह म्हणजेच स्वतःचे वंश निर्मूलन करणे होय.
या पत्रासह टीपू सुलतानने एक आज्ञापत्रही नगरप्रमुखाच्या नावाने पाठविले होते. त्यात त्या प्रमुखाला हुकूम दिलेला होता की, दोनशे राहती अशरफी रोख व दोनशे राहती किंमतीचे खाद्यान तुरंत स्वामीजींच्या सेवेत पाठविले जावेत. सदरहून पत्रात सुलतानने स्वामीजींना लिहिले होते.
"इनामी गावामधून वस्तूंची गरज असेल ती घेण्याचा आपणास अधिकार आहे. पाठविलेली रक्कम आणि अन्नपदार्थातून शारदादेवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ब्राह्मणांना भोजन दिले जावे व आमच्या शत्रूंच्या विनाशासाठी प्रार्थना केली जावी.
आणखीन एक सुलतानचे पत्र 'आपण पाठविलेला प्रसाद आणि शाली मिळाल्या आहेत. आपल्या उपयोगासाठी एक शालजोडी व देवीच्या मूर्तीसाठी वस्त्रे पाठविली जात आहेत.
जाकरी महिन्यात सुलतानने आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात स्वामीजींना कळविले आहे की "त्यांच्या खास स्वामीसाठी एक हत्ती पाठविला जात आहे. याच पत्रात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांच्या नावे जे आज्ञापत्र लिहिले होते त्याची नक्कलही जोडलेली होती. त्या आज्ञापत्रात बजावले गेले होते की स्वामीजीच्या शिष्यांवर बाहेर येण्या-जाण्यासंबंधी कोणतेही बंधन घातले जाऊ नये.'
हैदरी महिन्यातील एका नोंदीवरून कळते कि स्वामीजींनी मठातील दोन विशिष्ट पूजाविधी पार पाडण्यासाठी सुलतानाकडे आर्थिक सहाय्य मागितले होते. सदरहून पूजा ४८ दिवसांपर्यंत दररोज होणार होती. सुलतानने त्या विधिला मदत करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्याने नगर प्रमुखाला आज्ञा जारी केली की श्रीनगरी पाहून व्यवस्था परिपूर्ण करण्यात स्वामीजींशी सहकार्य करावे. हैदरी महिन्यात स्वामीजींना देखील टीपू सुलतानाने एक पत्र लिहिले होते की 'आपल्या इच्छेनुसार पूजेच्या काळात दररोज सहस्त्रबाह्मण भोजनासाठी व रोख रक्कम देण्यासाठी नगर प्रमुखाला हुकूम दिलेला आहे.
stay connected