सुलेमान देवळा येथील एसटी चालक किसन रामभाऊ घोडके पुरस्काराने सन्मानित

 सुलेमान देवळा येथील एसटी चालक किसन रामभाऊ घोडके पुरस्काराने सन्मानित



आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील एसटी वाहन चालक किसन रामभाऊ घोडके यांना दि १८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आष्टी विभाग यांनी ३६ वर्ष विनाअपघात सेवा दिली त्याबदल वाहक किसन घोडके यांना दिल्ली येथे बोलावून पुरस्कृत करण्यात आले . विना अपघात सेवा देणाऱ्या रस्त्यावरील नायकांना यावेळी सन्मानित करण्यात आले आहे.


यावेळी बोलतांना किसन घोडके यांनी सांगितले की कुठलेही काम छोटे अथवा मोठे नसते. आपण कामात प्रामाणिक पणा आणि सातत्य ठेवावे, नक्कीच जीवन सार्थकी लागते, प्रत्येक वाहकानी बस चालवत असताना विनाअपघात सेवा करावी आणि काळजी घ्यावी असे ते म्हणाले .


किसन घोडके याचे हे अभिमानास्पद कार्य असून त्यांचे अभिनंदन एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चैन्न, बीड विभागाचे प्रमुख मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी पडवळ, आष्टी आगार प्रमुख डोके, आष्टी आगार वाहतूक निरीक्षक जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गायकवाड तसेच सर्व स्तरातून व सुलेमान देवळा ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.