नवीन न्यायालय,आष्टी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून लवकरच उदघाटन होणार
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून या कामांची पाहणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ एम.के. पाटील, सहदिवाणी कनिष्ठ न्यायाधीश एस.व्ही.उतकर मॅडम यांच्या समवेत आ.सूरेश आण्णा धस यांनी पाहणी केली.
नवीन न्यायालय,आष्टी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून लवकरच उदघाटन होणार आहे.आ.सुरेश आण्णा धस यांच्या पुढाकाराने आष्टी नगरपंचायतमार्फत न्यायाधीश निवासस्थानाच्या मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या नालीचा प्रश्न मार्गी लावला असून पोलीस स्टेशन ते लेंडी नदीपर्यंत भूमिगत नाली कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वकील संघ अध्यक्ष ॲड.महादेव तांदळे,उपाध्यक्ष ॲड.राम मुटकुळे,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,
ॲड.बाबुराव अनारसे,ॲड.साहेबराव म्हस्के, यशवंत खंडागळे,ॲड.राकेश हंबर्डे, ॲड.रत्नदीप निकाळजे,सय्यद शमी, नगरसेवक भारत मुरकुटे,सुरेश वारंगुळे,किशोर झरेकर,सुनील रेडेकर,इर्शान खान,समीर शेख,अरुण सायकड,अक्षय धोंडे,लेखापाल प्रकाश हारकळ,इंजि.अत्तहर बेग,अजिनाथ गीते आदींसह आष्टी वकील संघ पदाधिकारी उपस्थित होते.



stay connected