कड्यात आ.सुरेश धस यांच्या हस्ते १३ कोटी २७ लक्ष रुपयांच्या हर घर जल योजनेचे भूमिपूजन

 कड्यात आ.सुरेश धस यांच्या हस्ते १३ कोटी २७ लक्ष रुपयांच्या हर घर जल योजनेचे भूमिपूजन

**********************************



***********************************

आष्टी (प्रतिनिधी / संदीप जाधव )

कडा ग्रामपंचायतअंतर्गत केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १३ कोटी २७ लक्ष रुपयांचा "हर घर जल" पाणी पुरवठा योजनेचा  भाजपाचे विधानपरिषद सदस्य आ.सुरेश धस यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी पाण्याची टाकी देवीनिमगाव रोडवर येथे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

   कडा शहरासाठी आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातुन १३ कोटी २७ लक्ष रुपयाच्या पाणी पुरवठा योजना कामासाठी निधी मंजूर झाला असून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मेहकरी प्रकल्पातून कडा शहरासाठी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार असून या योजनेमुळे शहरवाशीयांना शुद्ध पाणी व अनेक दिवसांपासून जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.या योजनेअंतर्गत प्रत्येक घर नळ ही संकल्पना आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने  साकार होणार आहे.



      कडा शहरामध्ये या पाणी पुरवठा योजने अंतर्गत प्रत्येक घरात नळ पोहचवून अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबविणार असुन धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न प्रमाणे राबविणार असून भविष्यात आष्टी आणि कडा शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणार असल्याचे ग्वाही आ.सुरेश धस यांनी दिली. ही योजनेचे काम अत्यंत जलद गतीने करून मार्च २०२४ पर्यत पूर्ण होईल असे कार्यकारी अभियंता प्रकाश गिरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

            यावेळी सभापती रमजान तांबोळी, माजी सभापती संजय ढोबळे,सरपंच युवराज पाटील,राजेंद्र दहातोंडे,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, रामशेठ मधुरकर,संपत सांगळे,योगेश भंडारी,यशवंत खंडागळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे,ठेकेदार व्ही. आर.महाजन,व्यवस्थापक निखिल चव्हाण,दत्ता होळकर,कार्यकारी अभियंता प्रकाश गीरी,उपविभागीय अधिकारी कल्लप्पा चिवरे,उप कार्यकारी अभियंता सोपान राख,सहाय्यक अभियंता सय्यद अर्षद आदींसह कडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.