निवडणूकांचे बिगुल वाजले

निवडणूकांचे बिगुल वाजले



मुंबई : राज्यात बहुचर्चित असलेल्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यामुळे राज्यात आणखी काही रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर निवडणूक आयोगाने या निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे

सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.





उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected