माहेश्वरी समाज बांधवाकडून बस स्थानकात पाणपोई व पोलिस चौकीसाठी रोख रक्कम

 माहेश्वरी समाज बांधवाकडून बस स्थानकात पाणपोई व पोलिस चौकीसाठी रोख रक्कम 


केज 



गुरुवार दि ६ रोजी हनुमान जयंती च्या निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने बस स्थानकात पाणपोई सुरू करण्यात आली . यावेळी नंदकिशोर मुंदडा यांच्या समोर बस स्थानकातील पोलिस चौकीचा विषय निघाला लागलीच समाजाच्या वतीने रोख पन्नास हजार रुपये जमा करून दिले . 

केज बसस्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्याची संख्या भरपूर असून याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे माहेश्वरी समाज बांधवाकडून ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा करून प्रवाश्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली . यावेळी बस स्थानकात पोलिस चौकी आहे परंतु त्याच्या दुरुस्ती व इतर सुविधा नसल्यामुळे मुळे अडचण निर्माण झाली असल्याचे नंदकिशोर मुंदडा यांच्या समोर ही बाब येताच समाजाच्या वतीने चौकीसाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले व स्वतः एकवीस हजार दिले व इतराचे असे मिळून पन्नास हजार रुपये जागेवर जमा करून लागलीच बस स्थानक कर्मचाऱ्यांकडे जमा केले . तसेच सिसीटिव्ही बंद असल्याचे समजल्यावर मी पाठपुरावा करतो असे सांगून लवकर सिसीटिव्ही चालू करून घ्या असे सांगितले . 

नंदकिशोर मुंदडा यांच्या तातडीने घेतलेल्या पोलिस चौकी साठी पैसे जमा करून जागेवर निकाली निघाल्यामुळे खेडोपाड्यातुन येणाऱ्या महिला व मुलीच्या अडचणी कमी होतील अशी चर्चा आहे . 

यावेळी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष मनीष जाजू , सचीव सचीन भुतडा , प्रकाश भन्साळी , ओमप्रकाश भुतडा , बालु भुतडा , विजय जकेटिया , विष्णू लोहिया यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.