ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ----------संतोषशेठ मेहेर,विजयशेठ मेहेर

 ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा
----------संतोषशेठ मेहेर,विजयशेठ मेहेर

**********************************



**********************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील हनुमंतगांव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवानिमीत्त  सालाबादप्रमाणे याहीवर्षी वै.प.पु.ह.भ.प.

गुरूवर्य मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने व ह.भ.प. आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.३० मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ झाला असून हे २८ वे वर्ष आहे.यानिमित्ताने आज गुरुवार दि.७ रोजी सकाळी १० वा. मदन महाराज संस्थानचे ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे जाहीर हरी किर्तन व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे विनंती आष्टी शहरातील प्रसिद्ध व्यापारी संतोष शेठ मेहेर,विजय शेठ मेहेर यांनी केली आहे.

     आष्टी शहरातील मेहेर ज्वेलर्स,बालाजी ट्रेंडर्स,मेहेर कलेकशन यांचे मालक सोने चांदीचे प्रसिध्द व्यापारी संतोष कुमार मेहेर, विजयकुमार मेहेर व मेहेर परिवार 

गेली २८ वर्षापासून मौजे हनुमंतगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात स्व.पू.प्यारी बाई गोकुळदासजी मेहेर व स्व.जयकुमार मेहेर यांच्या स्मरणार्थ काल्याचे कीर्तन व काल्याच्या दिवशी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करून पुण्यांचं काम करत आहेत. 

            समाज कार्यात नेहमी अग्रेसर असलेले मेहेर कुटूंब सामाजिक ,धार्मिक असो किंवा कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती त्यांनी या समाजसेवेत खारीचा वाटा उचलला असून तो अविरतपणे चालवत आहे. त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.आज मौजे हनुमंतगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळानिमित्ताने ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या होणाऱ्या काल्याचे जाहीरहरी कीर्तन व महाप्रसादाचा आष्टी तालुक्यासह, पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती संतोष शेठ मेहेर,विजय शेठ मेहेर,अमोल,अभिजित,अक्षय,श्रेयस, आकाश,ऋतिक यांच्यासह मेहेर कुटूंबांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.