छोटूमियाँ यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान
आष्टी तालुक्यातील नांदुर विठ्ठलाचे येथे सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या छोटूमियाँ यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे . ही यात्रा आज शनिवार दि . 22 रोजी संदल कार्यक्रमाने सुरु होत आहे तर उद्या दि 23 रोजी भव्य छबीना मिरवणूक होईल तसेच सोमवार दि . 24 रोजी नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत . यात प्रथम बक्षीस 71 हजार रुपये राहिल हि कुस्ती पै . शेख समीर व पै . रविराज सरवदे यांच्यात होणार आहे . तसेच पै . युवराज चव्हाण विरुद्ध पै आशिष वावरे यांच्यात 61 हजार रु ची कुस्ती होईल . पै अनिल ब्राम्हणे व पै . मनोज फुले यांच्यात 51 हजारांची कुस्ती होईल . पै रुषीकेष लांडे व पै आप्पा मोढुळे यांच्यानही 51 हजारांची कुस्ती होईल तर पै तुषार अरुण व पै . मयुर कनसे यांची 41 हजारांची कुस्ती होईल . तसेच इतरही अनेक मान्यवर पैलवानां च्या कुस्त्या येथे खेळल्या जाणार आहेत. त्यांनर रात्री 10.30 वा. दिपाली सुरेखा पुनेकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व कुस्ती प्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे .


stay connected