India : भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश....!
जगात अनेक वर्षापासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देश चीन होता, पण यंदा भारताने हा रेकॉर्ड मोड चीनला मागे टाकले असून संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नॅशनल पाॅप्युलेशन फंडच्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.
भारताची लोकसंख्या चीन पेक्षा २९ लाख जास्त असून देशाची लोकसंख्या वाढते १४२.८६ कोटीच्या वर गेली आहे, तर चीनमधील जन्मदर यावर्षी चांगलाच कमी झाला असून त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येताना दिसत आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली तर चीनची १४२.५६ कोटी आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली असून १९५० पासून जागतिक स्तरावर पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या संयुक्त राष्ट्राच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
मागील इसवी सन १८०० पर्यंत जागतिक लोकसंख्या ही १०० कोटीपेक्षा कमी होती, १०० कोटी वरून २०० कोटी होण्यास १०० वर्षाचा कालावधी लागला, मात्र ही १०० कोटीची झालेली वाढ अवघ्या बारा वर्षातच झाली असल्याने हा महत्त्वाचा टप्पा असल्याची संयुक्त राष्ट्र ने सांगितले,असून याच गतीने जर लोकसंख्या वाढत गेली, तर ९०० कोटीचा टप्पा २०३७ लाच पार करत २०५८ जाईल, असा अंदाज आहे.मग आपल्या पृथ्वीवर वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या १००० होईल.आता तब्बल ८ अब्ज लोकांचे वास्तव्य पृथ्वीवर असणार असून भविष्यात अन्न,धान्य,आरोग्य तसेच जीवनावश्यक वस्तू विषयी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्येच्या निधीच्या (युएनएफपाए) नवीन अहवालानुसार भारतातील ०-१४ वयोगटातील लोकसंख्या २५ टक्के , १०-१९ मधील १८ टक्के , १०-२४ वयोगटातील लोकसंख्या २६ टक्के तर १५-६४ वयोगटातील लोकसंख्या ६८ टक्के असून ७ टक्के लोकांचे वय ६५ पेक्षा जास्त आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीर केलेल्या अहवालानुसार, लोकसंख्येत सर्वाधिक वाढ ही २०१२ ते २०१४ दरम्यान झाली. गेल्या ७० वर्षात जागतिक लोकसंख्या वाढीत चीन व भारताची मोठी महत्त्वाची भूमिका असून दोन देशाची जर लोकसंख्या एकत्र केल्यास २.८० लोक या ठिकाणी राहतात.लोकसंख्या वाढ हा मानवी इतिहासात तसेच त्याच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येक सजक नागरिकांनी आता जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे.
या प्रचंड लोकसंख्या वाढीचे आव्हाने ही मोठी आहे. याचा विचार अभ्यास पूर्ण करून या लोकसंख्येच्या विस्फोटात्मक घडीला वसुंधरेचे होणारे परिणामाचा व उपायाचा शास्त्रीय दृष्टीतून नियोजनपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार असून, अन्नधान्य, रोगराई, निसर्गचक्र व त्याचे आव्हाने, तापमान वाढ, ऊर्जा, जल-जंगल- जमीन याचा,तसेच हवामान बदल व वैश्विक तापमाना वाढीमुळे होणारे परिणामाचा,प्रदूषणाचा, जलसंपत्ती,शेती आधी घटकांवर याचा परिणाम होणार आहे. निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूचा वापर सूर्यग्रह पद्धतीने करणे फायदेशीर ठरणार असून निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीची जपणूक करणे आवश्यक आहे निसर्ग टिकला तर सर्व टिकेल म्हणून निसर्ग वाढवणे जपणे टिकवणे हे प्रत्येकाची जबाबदारी नसून कर्तव्य समजून कार्य करणे आज गरजेचे आहे.सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश भारत झाला असला तरी आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत तरी सर्वाधिक युवकांचा देश म्हणून भारत आहे जगाला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करून या संधीचे सोने करू शकतो हे निश्चितच..!
- राहुल मोरे.
मो.नं.-९४०४१८११८१


stay connected