बसमधुन प्रवासा दरम्यान पाच तोळे सोनं असलेले पाकट अज्ञात चोरांनी केले लंपास
श्रीमती काशीबाई सोमनाथ हाके रा. रामकुंड ता. भुम या एस टी बसने पुण्याहुन भूमला जात असताना . अहमरनगर ते धानोरा दरम्यान बसमध्ये शेजारी बसलेल्या महिलेने त्यांच्या पर्समधील ५ तोळे सोने असलेले पाकिट लंपास केले . याप्रकरणी अंभोरा पोलिस स्टेशन येथे श्रीमती काशीबाई हाके यांनी फिर्याद दाखल केली असून त्या सध्या पुणे येथे पती, मुलगा व सुनेसह राहवयास आहेत . दि.06/04/2023 रोजी सकाळी 09.00 वा. सुमारास त्या मुळगावी रामकुंड येथे जाण्याकरिता वल्लभनगर बसस्थानक पुणे येथून कुर्ला ते बीड बस ने निघाल्या होत्या . अंदाजे दुपारी 01.30 वा. सुमारास त्या प्रवास करत असलेली बस धानोरा येथे थांबली असता त्यांच्या पर्सची चेन उघडी दिसल्याने त्या खुप घाबरल्या व त्यांना त्यांच्या पर्स मध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट मिळुन आले नाही म्हणुन त्यांनी सदर बाब बस कंडक्टर यांना सांगितली असता कंडक्टर व चालकाने बसमधील प्रवाशांकडे विचारपुस तसेच तपासणी केली परंतु कोणाकडे त्यांचे सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट मिळुन आले नाही.
चोरी झालेल्या सोन्याचे दागिने याचे वर्णन खालीलप्रमाणे
1) 40,000/- सोन्याचे मण्याचे गंठण सुमारे 02 तोळे वजनाचे जुने वापरते किंमत अंदाजे 2) 40,000/- सोन्याचे गोल डोरले व त्यात सोन्याचे मणी सुमारे 02 तोळे वजनाचे जुने वापरते
किंमत अंदाजे 3) 10,000/- सोन्याची अंगठी सुमारे 05 ग्रॅम वजनाची जुनी वापरती किंमत अंदाजे 90,000/- एकुण किंमत अंदाजे
याविषयी अधीक बोलताना त्यांनी तेजवार्ता ला सांगितले की दि. 06/04/2023 रोजी दुपारी 01.30 वा. सुमारास पुणे येथुन निघालेली कुर्ला ते बीड बस मी माझ्या मुळगावी चालले असता आष्टी तालुक्यातील धानोरा बसस्टँण्ड येथे बस आली असता मला माझ्या पर्सची चेन उघडी दिसली म्हणुन मी पर्स चेक केली तेंव्हा मी सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट मला मिळुन आले नाही म्हणुन माझी अज्ञात इसमाविरुद्ध चोरी केल्याची तक्रार आहे.
माझी बस अहमदनगर बसस्टँण्ड येथे आली असता तेथे माझे शेजारी अहमदनगर येथुन दोन अनोळखी महिला बस मध्ये आल्या असता त्यातील एक महिला माझ्या शेजारी बसली व दुसरी महिला तिच्या शेजारी उभी राहीली होती. त्या दोन्ही महीला धानोरा येथे उतरल्या होत्या तरी माझे दागिने त्यांनी चोरी केल्याचा माझा दाट संशय आहे.
अशा प्रकारे बसमधुन प्रवासा दरम्यान अनेक चोरींच्या घटना समोर आलेल्या आहेत . अहमदनगर येथून नेहमीच ३ महिला धागोरा येथे बसने येतात व लगेच पुन्हा अहमदनगरला परत जातात असे धानोरा बसस्थानकावरील काही व्यावसायीक सांगतात . याबाबत बारकाईने तपास करून तात्काळ गुन्हेगार चोरांचा तपास करावा अशी मागणी हाके कुटुबियां कडून होत आहे .


stay connected