अजिंक्य चांदणे यांच्या भाषणाने समाजप्रबोधन झाले, करुणा मुंढे यांची उपस्थिती,खालापूरी येथे दणक्यात भीम जयंती साजरी- डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी:-मौजे खालापुरी येथे महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती दणक्यात साजरी करण्यात आली असंख्य माता-भगिनी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांच्या प्रचंड गर्दीमध्ये महामानवाच्या प्रतिमेची डीजे लावून संपूर्ण गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने गाव दूमदूमुन गेले.तसेच "नासलेली मस्तके पुस्तकाने आणि प्रबोधनातून सुधरतात आणि मग सुधारलेली मस्तके कोणाचेही हस्तक होत नाहीत किंवा कोणापुढेही नतमस्तक होत नाहीत"ह्याच धरतीवर अजिंक्यभैया चांदणे यांचे शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांवर दीड तास भाषण झाले.यामध्ये समाजातील उच्च सुशिक्षित लोकांनी अशिक्षित लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे,त्यांना बोटाला धरून मोठ केलं पाहिजे समाजाच्या प्रवाहात आणले पाहिजे .शाहू फुले आंबेडकरी विचार तळागळापर्यंत पोहचवून सामान्य जनतेत ते पोहचवले पाहिजेत अन् समाज सुधारला पाहिजे.ज्याने त्याने शिक्षणाची कास धरून मोठमोठी पदे ग्रहण करून स्वतःसह समाजाची उंची वाढवली पाहिजे.आपल्या समाजाचा नोकरदार वर्ग वाढवून प्रत्येक क्षेत्रात आपला माणूस गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या समाजातील इतर लोकांनाही प्रवाहात आणले पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी सार्वजनिक भीमजयंती संस्थापक अध्यक्ष डॉ जितीन वंजारे यांनी प्रास्ताविक केले आणि सांगितले की महापुरुषांची जयंती ही त्यांचे विचार प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केली पाहिजे, खालापूरी गावात शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वेळोवेळी जागर निर्माण करून नवतरुंनाना मोठ्या प्रमाणावर जातीय अंताच्या लढ्यात सामील करू आणि यामुळेच मराठा समाजाचा आम्ही यंदाचा जयंती अध्यक्ष निवडला आहे ही एक मोठी क्रांती असून प्रत्येक गावागावात राबवली पाहिजेत असे विचार व्यक्त केले यावेळी शिव शक्ती सेना प्रवक्ते अजय देढे यांनी बाबासाहेब हेच आमच्या समाजाच भूषण असून त्यांच्या च संविधानावर देश चालतो तेच आपले आदर्श असेल पाहिजेत असे मत व्यक्त केले यानंतर अध्यक्षीय भाषणात सौ करुणा धनंजय मुंढे यांनी सामाजिक क्रांती ही सभागृहात पाठविलेल्या आपल्या प्रतिनिधी मुळे होईल त्यासाठी आपल्या मताचे आपल्या समाजाचे नेते सभागृहात पाठवले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या जयंती उत्सवास शुभेच्या देण्यासाठी आप चे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, प स सदस्य माऊली सानप,जा सानप आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी परजने यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव लोंढे यांनी केले.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
महामानव बोधिसत्व विश्वरत्न क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त खालापूरी येथे शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचे विचारवंत सन्माननीय अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या प्रबोधन पर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गाव कुसा बाहेरील समाज आज मोठा झाला ही क्रांती फक्त महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच घडली छत्रपतींनी सामान्य माणसाच्या हातात तलवारी देऊन त्याकाळी समनाता प्रस्थापित केली.स्वराज्य निर्माण केले.तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्री शिक्षण देऊन समाजात स्री पुरुष समानता प्रस्थापित केली.अशी ही शिव शाहू फुले आंबेडकर गुरू शिष्याची परंपरा अजिंक्य चांदणे यांनी अगदी सुंदर,सोप्या आणि समजेल अश्या शब्दात सांगितली.त्यावेळी सर्वजण मंत्रमुगध झाले होते तब्बल दीड तास त्यांचं झालेलं प्रबोधन जनतेने शांततेत एकूण घेतलं.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिव शक्ती सेना पक्षाच्या सर्वेसर्वा करूनाताई धनंजय मुंढे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, डीपीआय चे जिल्हा अध्यक्ष संतोष लोणके,शिवशक्ती सेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय देडे, खालापूरी पंचायत समिती सदस्य माऊलीदादा सानप, रायमोहा पंचायत समिती सदस्य तथा सभापती जालिंदरकाका सानप,सार्वजनिक भिमजयंती संस्थापक अध्यक्ष डॉ जितीनदादा वंजारे,जयंती अध्यक्ष सचिन परजने,सचिव नितीन वंजारे,उपाध्यक्ष अक्षय लोंढे, कार्याध्यक्ष शाम लोंढे,सरपंच गणेश घोलप,माजी सरपंच किरण परजने,सदस्य प्रकाश परजने,तंटामुक्ती अध्यक्ष रशीद शेख, काथकडे सर,सावता परिषदेचे बापू जाधव,लोंढे साहेब,पोलीस पाटील विष्णू वंजारे,जयंती सचिव रोहित नवले,सदस्य अभिषेक जोगदंड,ऋषिकेश वंजारे,रोहन वंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.त्याच बरोबर गावातील परिसरातील असंख्य कार्यकर्ते,अबाल वृद्ध,ग्रामस्थ उपस्थित होते.



stay connected